Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

कोल्हापूरच्या जवानाचा मोशी दुर्घटनेतील ८२ तासांच्या बचावकार्यात मोलाचा सहभाग

  कोल्हापूरच्या जवानाचा मोशी दुर्घटनेतील ८२ तासांच्या बचावकार्यात मोलाचा सहभाग कंदलगाव , ता. १५ : पुणे जिल्ह्यातील मोशी येथे नुकत्याच झालेल्...

 कोल्हापूरच्या जवानाचा मोशी दुर्घटनेतील ८२ तासांच्या बचावकार्यात मोलाचा सहभाग



कंदलगाव , ता. १५ : पुणे जिल्ह्यातील मोशी येथे नुकत्याच झालेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर राबविण्यात आलेल्या बचाव आणि शोध मोहिमेत कोल्हापूरच्या जवानाने उल्लेखनीय योगदान दिले आहे. मूळचे कोल्हापूरचे रहिवासी आणि सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) मध्ये कार्यरत असलेले श्रीकांत पाटील यांनी या अत्यंत आव्हानात्मक मोहिमेत सलग ८२ तास प्रत्यक्ष सहभाग घेतला.


दुर्घटनेनंतर NDRF च्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. या मोहिमेदरम्यान श्रीकांत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अविरत परिश्रम घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ९ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्त्वाचे योगदान दिले. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ नागरिकांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्याच्या अत्यंत संवेदनशील आणि कठीण कार्यातही त्यांनी सहभाग नोंदविला.


अरुंद जागा, अस्थिर ढिगारा, सतत कोसळण्याचा धोका आणि वेळेशी सुरू असलेली शर्यत अशा प्रतिकूल परिस्थितीत NDRF च्या जवानांनी अत्यंत धैर्य, संयम आणि व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडविले. या संपूर्ण बचाव मोहिमेत श्रीकांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी राहून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले.


कोल्हापूरच्या सुपुत्राने राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वपूर्ण बचावकार्यात दिलेले योगदान जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या कार्यामुळे NDRF च्या सेवाभाव, शौर्य आणि समर्पणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

No comments