माणुसकीला काळिमा:नेर्ले येथे सातळीदेवी परिसरात अर्भकाचा मृतदेह सापडला कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार नेर्ले ता.शाहुवाडी येथे माणुसकीला...
माणुसकीला काळिमा:नेर्ले येथे सातळीदेवी परिसरात अर्भकाचा मृतदेह सापडला
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार
नेर्ले ता.शाहुवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.नेर्ले येथील सातळीदेवीच्या डोंगराजवळील एका विहिरीत एका नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेर्ले येथील साताळीदेवी परिसरातील तलावाशेजारी असलेल्या विहिरीत एका नवजात बालकाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही बाब लक्षात येताच नेर्लेच्या पोलीस पाटील दिपाली गवळी यांनी तात्काळ शाहुवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
अर्भकाला तातडीने मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या निष्ठुर कृत्याबाबत सध्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे अर्भक तिथे कोणी आणून टाकले आणि यामागचे नेमके काय कारण आहे? याचा शोध शाहुवाडी पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनुने व सहकारी पोलीस करत आहेत.
No comments