जी रा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल रुकडी येथे आरुष याचा, वाढदिवस अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेशन,विष्णू ताम्हाणे यांच्या हस्ते वह्या वाटप करू...
जी रा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल रुकडी येथे आरुष याचा, वाढदिवस अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेशन,विष्णू ताम्हाणे यांच्या हस्ते वह्या वाटप करून साजरा
चॊकाक (ता. हातकणंगले )येथील पत्रकार व आरुष न्यूज चॅनेल चे संपादक शीतल कांबळे यांचे चिरंजीव आरुष याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे आन्वेशन कोल्हापूर विभाग मा विष्णू सीताबाई नाथा ताम्हाणे यांच्या हस्ते जिन्नापा रायापा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल रुकडी शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या वाटप करून साजरा केला यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार भरत चिंचवाडे यांनी केलं तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रिना कांबळे मॅडम यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले, तसेच उपस्थित पत्रकारांचा सत्कार मुख्याधिपीका सोफिया मुजावर यांनी केला, उपस्थित जीवन बाणेकर यांचा देखील सत्कार कारण्यात आला, यावेळी अध्यक्षीय भाषणात ताम्हाणे साहेबांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जीवन जगत असताना येत असलेल्या समस्या आणी अडथळे दूर करून पुढे जाण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, समस्याना सामोरे जाण्याचा मुलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला, अजित यांनी देखील प्रोत्साहन पर संदेश मुलांना दिला, व शीतल कांबळे यांच्या हातून वारंवार सत्कार्य घडत असल्याची जाणीव करून दिली, यावेळी उपस्थित, सौ सोफिया मुजावर मॅडम, कु. रिना कांबळे मॅडम, सौ. माधुरी परीट मॅडम, सौ. सारिका महाडिक मॅडम, सौ. रोहिणी मगदूम मॅडम, सौ पदमश्री कुंभार मॅडम, सौ. निर्मला पाटील मॅडम सौ. पूजा बिडकर मॅडम, कु. वैष्णवी पाटील मॅडम, सौ. यशश्री पाटील मॅडम, भरत चिंचवाडे, पत्रकार संतोष कोठावळे, संदीप कोले पत्रकार, अजित शिंदे पत्रकार, जीवन बाणेकर, शीतल कांबळे प्रांजल कांबळे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता.

No comments