शाहू स्मारक भवनात मंथन फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची दिमाखदार सांगता कोल्हापूर : मंथन फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार स...
शाहू स्मारक भवनात मंथन फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची दिमाखदार सांगता
कोल्हापूर : मंथन फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमामुळे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन मान्यवर, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या उपस्थितीने अक्षरशः दुमदुमून गेले.
या सोहळ्याचे आयोजन पत्रकार सागर शेळके यांनी केले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मुंबई, पुणे, नाशिक तसेच विविध जिल्ह्यांमधून आलेल्या पुरस्कारार्थींनी कार्यक्रमाला विशेष शोभा आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीमध्ये सुप्रसिद्ध व्याख्याता सौ. सुषमा पाटील (कोल्हापूर), शिवराज विद्यालय व कॉलेजचे संस्थापक श्री. किसनराव कुराडे सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संजीव भोर, माजी सैनिक आण्णासाहेब खैरनार, मनसे तालुका अध्यक्ष राहुल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी सुभाष भोसले तसेच डॉ. प्रा. बी. बी. घुरके सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजकार्य, शिक्षण, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया टीम यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच अग्नेल चव्हाण (योगदान पोर्टल उपसंपादक) यांचे आयोजक म्हणून विशेष योगदान लाभले.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक केले. राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
मंथन फाऊंडेशनचा हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून, समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या योगदानाला सलाम करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
— पत्रकार सागर शेळके
आयोजक, मंथन फाऊंडेशन






































































































No comments