Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मनपा पी. एम. श्री महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी कोल्हापूर या विद्यालयात शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहात साजरा

  नवागत विद्यार्थ्यांचे घोडा गाडीतून स्वागत मनपा पी. एम. श्री महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी कोल्हापूर या विद्यालयात शैक्षणिक वर्षाचा प्रार...

 नवागत विद्यार्थ्यांचे घोडा गाडीतून स्वागत

मनपा पी. एम. श्री महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी कोल्हापूर या विद्यालयात शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहात साजरा 



फुलेवाडी वार्ताहर-नारायण लोहार 


फुलेवाडी-आज दिनांक 15-06-2026 रोजी मनपा पीएम श्री महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी, कोल्हापूर या विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव अतिशय उत्साह पूर्ण व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. 

नवागत विद्यार्थ्यांचे घोडागाडीतून धुमधडाक्यात स्वागत 

शाळेत प्रथमच येणाऱ्या नूतन विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने घोडागाडीतून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून टाळ्यांच्या गजरात सर्व उपस्थित पालक व मान्यवरांच्या समवेत स्वागत करण्यात आले.

त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 


शिक्षणाच्या नव्या प्रवासाला उत्साहात सुरुवात 

शाळेत रंगीबेरंगी सजावट, आनंदी वातावरण आणि विविध उपक्रमामुळे शाळा परिसरात उत्साहाने फुलून गेला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागामुळे प्रवेश उत्सव अधिकच आकर्षक ठरला. 

नशा मुक्त शपथ अभियान 


शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री. उत्तम वाईगडे यांनी उपस्थितांना नशा मुक्त अभियानाची शपथ देऊन अभियानाचे सविस्तर माहिती दिली. या शाळा प्रवेश कार्यक्रमास सौ. माधवी पाटील नगरसेविका, श्री. मनीष रणभिसे मुख्य अग्निशमन अधिकारी, सुप्रिया खाडे अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती, अभिमन्यू पवार सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे व सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगत आतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाळेत नव्याने हजर झालेल्या नितीन खोडे व विजय माने या शिक्षकांचे मान्यवरांच्या हस्ते मुला पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती चौगुले यांनी केले प्रास्ताविक व शाळेच्या कामगिरीचा आढावा कुलदीप जठार सर यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे आभार संतोष आंबेकर सर यांनी मानले.

No comments