Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

आपण कायम आठवणीत, कामाचा माणूस म्हणून होती दादांची ओळख

  आपण कायम आठवणीत, कामाचा माणूस म्हणून होती दादांची ओळख !  प्रतिनिधी. आपल्या प्रवासामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांना मनात ठेवावं की हृद...

 आपण कायम आठवणीत, कामाचा माणूस म्हणून होती दादांची ओळख ! 



प्रतिनिधी. आपल्या प्रवासामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांना मनात ठेवावं की हृदयात हेच समजत नाही, असेच आपल्या सर्वांचे गोरगरीब जनतेचे  लाडके लोकप्रिय महाराष्ट्रांचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित अनंतराव पवार  ( दादा ) खऱ्या अर्थाने यांची आजही संपूर्ण महाराष्ट्राला दादा हवे होते... पण नियतीच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही असे म्हणतात... मुंबई वरून बारामतीकडे प्रवासादरम्यान 28 जानेवारी 2026 विमान अपघातामध्ये दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरच दादा शेवटच्या श्वासापर्यंत कामाचा माणूस म्हणून दादांची आजही ओळख राहिली आहे. शिस्त, आणि स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा झटपट निपटारा करणाऱ्या कार्यशैलीसाठी दादा चांगलेच ओळखले जात होते. दादांनी नेहमीच राज्यांच्या विकासाला चांगलीच गती दिली होती. त्यांची कामावरील निष्ठा ही महाराष्ट्रांच्या कायमच स्मरणात राहणार आहे. दादांकडे नेहमी शिस्त आणि वेळेला जास्त महत्व होतं महाराष्ट्रांच्या अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. राज्यांच्या तिजोरीवर मजबूत पकड ठेवून विकासाला गती दिली होती. दादा जे बोलायचे ते थेट स्पष्ट बोलायचे भलेही ते कोणाला आवडेल, किंवा नाही याचा कधीच विचार करत नव्हते. दादा हे (22 जुलै 1959-28 जानेवारी 2026) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते.( 2 जुलै 2023 पासून आपल्या मृत्यूपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. 1985 मध्ये त्यांचा विवाह सुनेत्रा ताईंशी झाला. पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत. दादा हे महाराष्ट्रांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचे पुतणे होते. दादांचं आपल्या तीन दशकांच्या राजकीय कारकीर्दींत राज्यांच्या विकासाला मोठे योगदान ठरलं, दादांची एन्ट्री नेहमीच दमदार होती. आपल्या भाषणामध्ये गमतीशीर डायलॉग नेहमी बोलायचे, त्यामुळे दादांची सभा म्हटलं की तुफान गर्दीं पाहायला मिळायची, पण आज दादा नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. तुम्हां सर्वांच्या संपर्कातील दादांसारखा नेता आता पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही,*

No comments