महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे गुरुकुल सभा पालकांच्या उपस्थितीत संपन्न प्रतिनिधी / संदीप कोले हातकणंगले तालुक्यातील महात्मा गांधी ...
महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे गुरुकुल सभा पालकांच्या उपस्थितीत संपन्न
प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे पाचवी आठवी विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची सुरुवात रयत शिक्षण चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. गुरुकुल विषयी माहिती गुरुकुल विभाग प्रमुख पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर आठवी शिष्यवृत्ती बाबतीत शेलार सर यांनी मार्गदर्शन केले. एन. एम.एम.एस परीक्षा मार्गदर्शन कदम सर यांनी केले, याप्रसंगी पालक प्रतिनिधी अनुजा पाटील यांनी शालेय शिस्त व शालेय अभ्यासाचा आमच्या मुलावर नक्कीच सकारात्मक परिणाम होत आहे आणि शालेय नवीन शिक्षक वर्ग खूपच विद्यार्थी संदर्भात कष्ट घेत आहे असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी उप मुख्याध्यापक जे ए पाटील व पर्यवेक्षक वजरीणकर सर यांनी नवनवीन शालेय उपक्रम व विद्यार्थ्यासमोर येत असणारी आव्हाने व रयत शिक्षण संस्था राबवत असणाऱ्यांना नवीन प्रकल्पाची माहिती आपल्या मनोगतच्या द्वारे व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडगर मॅडम यांनी केले. ए. एम.पाटील सरांनी उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे व शिक्षकांचे आभार मानले.
No comments