Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

हनुमान टाकळी ची रहाड यात्रा भाविकांचे धार्मिक अधिष्ठान होय.

  हनुमान टाकळी ची रहाड यात्रा भाविकांचे धार्मिक अधिष्ठान होय. लालबुंद विस्तवावरून चालतात भाविक पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी ता...

 हनुमान टाकळी ची रहाड यात्रा भाविकांचे धार्मिक अधिष्ठान होय.



लालबुंद विस्तवावरून चालतात भाविक

पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी हे गाव फार पुरातन काळापासून धार्मिकतेचे अधिष्ठान असलेले अन पौराणिक महत्त्व असलेले गाव म्हणून परिचित आहे. पुराणा मध्ये राजा हर्षवर्धन यांनी इसवी सन 606 मध्ये  वृद्धा नदीकाठच्या टाकळी वनस्पती असलेल्या या जंगल भूमीमध्ये एक मोठा महायज्ञ केला होता अशी पौराणिक कथा आहे. दासबोध ग्रंथाच्या संदर्भानुसार हनुमान टाकळीच्या रहाड यात्रेला 359 वर्षाची मोठी परंपरा आढळून येते. समर्थ रामदास स्वामी यांनी 1576 मध्ये सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावरून त्यांच्या जन्मभूमी असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब या गावी जात असताना श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या ठिकाणी त्यांनी गाईच्या शेण व गोमित्रापासून(गोमयीन) हनुमानाची मूर्ती तयार केली व तिची स्थापना या ठिकाणी केली. नवसाला पावणारा देव म्हणून राज्यात हे ठिकाण सर्वपरिचित आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर आषाढ महिन्यातील अमावस्येला रहाड यात्रा उत्सव या ठिकाणी भरतो त्यामध्ये मंदिराच्या समोर बारा फूट लांब, दोन फूट रुंद, व साधारणता दोन फूट खोल खड्डा खोलला जातो व त्यामध्ये बोरीच्या लाकडाचे तुकडे टाकून पेटवले जातात त्या लाकडाचा लालबुंद विस्तव पडला की त्याची विधिवत पूजा केली जाते व त्यावरून नवस्फूर्ती करणारे भाविक भक्त जय बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,अशा घोषणा देत त्या विस्तवावरून पळत जातात. अबाल वृद्ध या विस्तवावरून चालण्याचा अनुभुती घेतात. कुठल्याही भाविकाच्या पायाला भाजले जात नाही. कोणालाही इजा होत नाही , हेच या रहाड यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.



    सुरुवातीला संस्थांनचे अध्यक्ष परमपूज्य रमेश आप्पा महाराज, सचिव सुभाष बर्डे, वृद्धेश्वर चे संचालक सुभाष ताठे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून अग्नीकुंडात नारळ अर्पण करण्यात आला, त्यानंतर यात्रेचे मानकरी आष्टी तालुक्यातील बाबासाहेब लोखंडे हे त्या विस्तवावरून पळत गेले आणि त्यानंतर राज्यातून आलेली इतर भाविकांनी या यात्रेची अनुभूती घेतली. या यात्रेसाठी शेवगाव, पाथर्डी ,आष्टी ,नेवासा नगर तालुक्यातून हजारो भावीक या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. संयोजन समितीने अतिशय सुंदर व देखने नियोजन केले होते. रहाड ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला लोखंडी संरक्षण कठडा तयार करण्यात आला होता. त्या ठिकाणी स्वयंसेवक साईनाथ बर्डे, डॉक्टर रामदास बर्डे, बंडू बर्डे, लक्ष्मण बेर्डे, संदीप गायकवाड, बाबासाहेब घुले, श्रीपाद बर्डे, यांनी सर्व परिस्थिती यशस्वीपणे हाताळत भाविकांची काळजी घेतली. भाविक वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर असल्यामुळे स्क्रीन वरती भाविकांना रहाड यात्रेचे क्षणचित्रे दाखवण्यात येत होती. स्पीकर वरून भाविकांसाठी योग्य त्या सूचना दिल्या जात होत्या. तसेच प्रसादाचे आयोजनही यात्रा कमिटीने केले होते. यात्रेमध्ये खेळणी, मिठाई, गृह उपयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने, प्रसादाची स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली होती. खरेदीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यात्रा संपल्यानंतर सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी रस्त्यावर झाली होती, त्यामुळे दोन तास भाविकांना रस्त्यावर थांबावे लागले. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची उनिव मात्र प्रकर्षाने जाणवली.



No comments