तीन एकर वावरी शेत विकून तीन बहिणीने केली दोन भावांची फसगत !. ⭕ शेतजमीन विकण्यासाठी येनापुर - कोनसरी भागासह गडचिरोलीतही दलालांचा सुळसुळाट??...
तीन एकर वावरी शेत विकून तीन बहिणीने केली दोन भावांची फसगत !.
⭕ शेतजमीन विकण्यासाठी येनापुर - कोनसरी भागासह गडचिरोलीतही दलालांचा सुळसुळाट??
⭕ कमिशन साठी दलालांकडुन शेतकऱ्यांची फसगत.
गडचिरोली ( चक्रधर मेश्राम) दि.२७ जुलै २०२५:-
गडचिरोली जिल्ह्यातील
कोनसरी,आंबोली,वायगाव आणि आजु बाजूच्या गाव परिसरातील जमीन खरेदी -विक्री करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट शिगेला पोहचला असून या दलालांनी शेतजमिनी विकत घेण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे.
शेतजमिनी विकत घेण्याचा नावावर या परिसरातील दलालांनी घरातील महिलांनाही पुढे करून मोठ्या प्रमाणात शेतजमिनी विकत घेताना दिसत आहेत. अशी माहिती विचार क्रांती चे संस्थापक संपादक अनुप मेश्राम यांनी दिली.
या परिसरातील
शेतजमिनीची खरेदी- विक्री करताना व सातबारा वर असलेल्या व्यक्तीच्या शेतजमिनीचे स्वतंत्र हिस्से पडले नसताना सुद्धा जमीनी खरेदी - विक्री करणाऱ्या दलालांनी सातबारावर नावे असलेल्या व्यक्तींना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी अंधारात ठेवल्या जात आहेत. आंबोली, कोनसरी सग्नापुर , वायगाव या गाव परिसरात वास्तव्य करणाऱ्या या तिन्ही बहिनीनी दलालांच्या सहकार्याने, मदतीने आपल्या सख्या दोन भावांना अंधारात ठेवून व कुठलाही थांग पत्ता लागू न देता दलालांच्या माध्यमातून तीन एकर वावरी शेतीची विक्री करून आपले हात पिवळे केलेले आहेत.
गाव - गाड्यातील लोक चर्चेनंतर दोन भावांना लोकचर्चेतून लगेच जाग आली . या दोन्ही भावांनी गावखेड्यात असलेल्या तिन्ही बहिणीकडे जाऊन विकी केलेल्या शेतवावरा बद्दल विचारणा केली असता. " आम्ही आमच्या हक्काची शेत जमीन विकली तुम्ही तुमचे बघून घ्या? असे उत्तर देऊन तिन्हीही बहिणीने आपल्या सख्या दोन्ही भावांना निरउत्साही करून त्यांना घरातून हुसकावून लावले असल्यामुळे आक्षेपार्ह वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात महिलांना पुढे करून अनेक दलालांनी अशाच प्रकारे कित्येकांच्या शेतजमिनी खरेदी करण्याचा खुले आम गोरखधंदा सुरू केलेला आहे.तीन बहिणीने विकलेल्या शेतवावरा सबंधी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत असून खरेदी करणारे दलाल कोण......? आहेत या बाबत शोध घेणे गरजेचे आहे. दलालांच्या माध्यमातून अवैधरित्या शेतजमिनी खरेदी - विक्री केल्या जात असल्याने शेतकऱ्यांची फसगत होत असल्याचे सांगितले जात आहे..
No comments