Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

सामाजिक कार्यकर्ते संजय तांबे यांना "क्रीडारत्न पुरस्कार" जाहीर

 सामाजिक कार्यकर्ते संजय तांबे यांना "क्रीडारत्न पुरस्कार" जाहीर महिलांच्या क्षमताचे नवे मापदंड तयार करणारा संजय तांबे हा एक अवलिय...

 सामाजिक कार्यकर्ते संजय तांबे यांना "क्रीडारत्न पुरस्कार" जाहीर



महिलांच्या क्षमताचे नवे मापदंड तयार करणारा संजय तांबे हा एक अवलिया समाजसेवक



 अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सर्जेराव तांबे यांना द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचा आय डॉल ऑफ महाराष्ट्र या सन्मान सोहळ्यात देण्यात येणारा "क्रीडा रत्न" हा राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांच्या शुभहस्ते एका शानदार कार्यक्रमांमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 11:30 वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर उद्यान शेजारी वानवडी ,पुणे या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.

     यावेळी कार्यक्रमासाठी डॉक्टर राजकुमार शिंदे( पोलीस उपयुक्त पुणे शहर), बाळासाहेब शिवरकर मा. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रशांत जगताप मा. महापौर पुणे मनपा, शिवाजीराव केदारी मा. नगरसेवक स्थायी समिती सदस्य मनपा, श्रीपती देशमाने सेवानिवृत्त सुभेदार पुणे, अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब कोठुळे राज्य सचिव, शकील भाई मन्यार जिल्हाध्यक्ष पुणे यांच्यासह पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.   

     सामाजिक कार्यकर्ते संजय तांबे हे पुणे जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील एक गतिमान नेतृत्व असून त्यांच्या कार्याचा आलेख अनेक चळवळीला स्पर्श करून जातो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता क्रीडा, आरोग्य, शिक्षण व आत्मरक्षण हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ध्येयाने पछाडलेल्या या कार्यकर्त्याने शाळा व महाविद्यालयातील मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण व पारंपरिक लाठी, काठी तलवारबाजी ,दांडपट्टा धानधारणा व इतर सर्व खेळांचे प्रशिक्षण पुणे जिल्ह्यामध्ये देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचा हा सामाजिक उपक्रम आहे. अन्याय व अत्याचाराला मुलीने बळी न पडता सं संरक्षण करावे हा उदात्त हेतू या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समोर ठेवला आहे. त्यांची सर्व टीम या कामी त्यांना मोलाची मदत करते. आज पर्यंत त्यांनी वीर रणांगणा शैक्षणिक संस्था, रोटरी क्लब, बाल रंगभूमी परिषद, प्लेसमेंट सर्व्हिस, या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क प्रभावी असून त्यांच्या याच कार्याची दखल घेत युवा ग्रामीण पत्रकार संघाने त्यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न हा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पुणे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक व सामाजिक स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments