कोल्हापुरात चौदा सप्टेंबरला होणार संविधान महोत्सवात वीस भाषेमध्ये प्रास्ताविक संविधान गीत सादर प्रतिनिधी / संदीप कोले अश्वघोष आर्ट कला ...
कोल्हापुरात चौदा सप्टेंबरला होणार संविधान महोत्सवात वीस भाषेमध्ये प्रास्ताविक संविधान गीत सादर
प्रतिनिधी / संदीप कोले
अश्वघोष आर्ट कला कल्चर कोल्हापूर फाउंडेशन यांच्यावतीने कोल्हापूर दसरा चौक येथे देशातील सर्वात मोठा सविधान महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमांमध्ये देशभरातून येणारे पंधराशे गायक कलाकार भारत देशाचे प्रमुख 20 भाषेमध्ये संविधानाची प्रास्ताविक गीत सादर गाऊन भारतीय संविधानाला अभिवादन करण्यात येणार आहे या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या जागतिक मानक या संस्थेमध्ये होणार आहे. यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी पाली संस्कृत कन्नड उर्दू कोकणी पंजाबी गुजराती राजस्थानी सिंधी भोजपुरी असामी नेपाळी तेलुगु ओडिसी मैथिली तसेच भारतीय सांकेतिक भाषा मूकबधिर अशा भारतातील एकूण वीस भाषेमध्ये सुमधुर संगीता सह संविधानाची प्रास्ताविक गीत 1500 गायकांच्याकडून गायले जाणार आहे. हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गायक संगीतकार कबीर नाईकनवरे, व प्रधान सचिव न्याय विभाग महाराष्ट्र राज्य डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक दसरा चौक येथे सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.
No comments