Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

निमगाव वाघा येथे राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न-पै. नाना डोंगरे

  निमगाव वाघा येथे राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न-पै. नाना डोंगरे अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-स्व.पै. किसनर...

 निमगाव वाघा येथे राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न-पै. नाना डोंगरे



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर सार्वजनिक वाचनालय, व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी मराठी साहित्यावर प्रेम करणारे अनेक साहित्यिक उपस्थित होते.



      या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र फंड हे होते. तर एडवोकेट राजेश कातोरे (अध्यक्ष, अहमदनगर बारासोसिएशन) हे स्वागत अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमास लाभले होते. यावेळी विचार मंचावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे/देशमुख, ग्रामीण कवी आनंदा साळवे, काव्य संमेलनाचे अध्यक्ष गीताराम नरवडे, एडवोकेट सुरेश लगड, निमगाव वाघाच्या सरपंच सौ. उज्वला कापसे यांच्यासह आयोजक पैलवान नाना डोंगरे व आदी मान्यवर उपस्थित होते.



     व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पैलवान नाना डोंगरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सर्वांच्या समोर मांडला. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व गुणवंत व प्रज्ञावंताचा सन्मान करणे तसेच समाजातील ज्वलंत प्रश्नावर साहित्य निर्मिती व्हावी या उद्देशाने आपण कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर सर्व उपस्थितांची त्यांनी तोंड भरून कौतुक केले व व मान्यवरांचा यथोचित सन्मान केला. स्वागत अध्यक्ष एडवोकेट राजेश कातोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर प्रथम सत्राची सांगता करत सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.

      ‌ द्वितीय सत्रा मध्ये प्रसिद्ध कथाकथनकार बाळासाहेब देशमुख यांच्या "पापी पेठ का सवाल"या कथेचे उत्कृष्ट सादरीकरण करत देशमुख यांनी रसिकस्रोत्यांच्या काळजाला हात घातला यानंतर निमंत्रितांचे काव्य संमेलनाचे सत्र कवी गीताराम नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यामध्ये कवी बाळासाहेब पाटील, सौ. गीते हेमलता, कवी रूपचंद शिदोरे, कवी बाळासाहेब कोठुळे, कवी ज्ञानदेव पठारे, कवी आत्माराम शेवाळे, कवी बाळासाहेब मनतोडे, कवी त्र्यंबक देशमुख, कवयित्री जयश्री सोनवणे, कवी गोकुळ गायकवाड, कवि चंद्रकांत चाबुकस्वार, कवी रामदास कोतकर, कवी देवीदास बुधवंत, कुमारी रेणुका ताठे, कुमारी धनश्री घोडके, ज्येष्ठ ग्रामीण कवी आनंदा साळवे, गोविंद पाठक, कवी गीताराम नरवडे, कवी राजेंद्र फंड, कवी संदीप रासकर, यांनी आपल्या कविता सादर केल्या व उपस्थित रसिकाची मने जिंकली. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी संदीप रासकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर फंड यांच्या अध्यक्ष भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. उद्याच्या येणाऱ्या नवीन पिढीने कसदार व वास्तववादी साहित्य मराठी साहित्य क्षेत्राला द्यावे व त्यातून आदर्श समाज निर्माण व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या साहित्य संमेलनासाठी पंचक्रोशीतील अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.

No comments