Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

ज्येष्ठ साहित्यिक "हुमायून आतार'साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 ज्येष्ठ साहित्यिक "हुमायून आतार'साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित 'सुवर्णयुग' हे "कली युगा'तील सामाजिक बांधिलकीचे ...

 ज्येष्ठ साहित्यिक "हुमायून आतार'साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित


'सुवर्णयुग' हे "कली युगा'तील सामाजिक बांधिलकीचे आदर्श निर्माण करणारे व्यासपीठ-आ. राजळे



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील "साहित्यरत्न' पुरस्कार यावर्षी पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ साहित्यिक हूमायून आतार यांना पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय काका आव्हाड, डॉक्टर मृत्युंजय गरजे, नंदकुमार शेळके, बंडू पाटील बोरुडे, श्रीतीलोकचे प्राचार्य अजय भंडारी सर, डॉक्टर जी. पी. ढाकणे, मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र शेवाळे, उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाल सिंह शेखावत, आशा  जोजारे, गणेश बाहेती, अशोक दौंड, योगेश घोडके, कुणाल महानवर, शैलेंद्र दहिफळे आदी मान्यवर यावेळी विचार मंचावर उपस्थित होते.

   हुमायन आतार हे पाथर्डी शहरातील रहिवासी असून ते हिंदीमधील एक प्रभावी शायर आहेत. शायरी मधील त्यांची प्रतिभा आणि कल्पकता ही रसिक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. छोट्या छोट्या वाक्य म्हणून कमालीचा अर्थ काढणारी त्यांची शायरी आणि तितक्याच खुबीनी सादरीकरण करण्याची त्यांची उत्कट कला या मधून त्यांची शायरी बहरत जाते. साधी राहणी व प्रत्येकाची मनधरणी व प्रभावी जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू होय. आजपर्यंत हजारो ग्रामीण साहित्यसंमेलना मधून त्यांच्या शायरीचा प्रवास पहावयास मिळतो. ग्रामीण रसिकांच्या इतकीच शहरी स्रोत्यांच्याही काळजाला स्पर्श करून जाणारी त्यांची शब्दरचना अवर्णनियच म्हणावी लागेल. साहित्यावर व प्रत्येक माणसावर निर्व्याज प्रेम करणारा हा शब्दप्रभू माणुसकीचा जादूगारच म्हणावा लागेल. वेळप्रसंगी स्वतःच्या प्रपंचावर व कामावर तुळशीपत्र ठेवून समाजाचा गाडा पुढे नेण्यातच धन्यता मानणारा हा सेवक पाथर्डीच्या लोक मनातील कधी ताईत बनला आहे हे कोणालाच कळाले नाही. सामाजिक उपक्रमाची बांधिलकी स्वीकारून ती पूर्ण करणारा हा ध्येयवेढा समाजसेवक व साहित्यिक असल्यामुळे पाथर्डीतील सुवर्णयोग तरुण मंडळाने यावर्षी 2025 साहित्यरत्न पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे.

   आज पर्यंत त्यांच्या नावावर अनेक  पुरस्कार नोंदवले गेले असून अनेक सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. यावेळी आमदार राजळे यांनी सुवर्णयुग मंडळाचे तोंड भरून कौतुक  केले. सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान देणारी मंडळाची कामगिरी राज्यभर पोचली आहे. मंडळाच्या विधायक उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकीचा आदर्श मंडळाने निर्माण केला आहे या गोष्टीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

    या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उमेश रासने यांनी केले तर अभय गांधी यांनी दमदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले तर मुकुंद लोहिया यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी पाथर्डीतील  महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments