⭕चौदाव्या दिवशीही एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरुच. ⭕ मुख्यमंत्र्यासह आरोग्य मंत्री आणि निर्लज्ज महाराष्ट्र शासन झोपेत?? ⭕ शास...
⭕चौदाव्या दिवशीही एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरुच.
⭕ मुख्यमंत्र्यासह आरोग्य मंत्री आणि निर्लज्ज महाराष्ट्र शासन झोपेत??
⭕ शासकीय सवेत नियमित समायोजन करण्याची प्रमुख मागणी,
गडचिरोली : (चक्रधर मेश्राम) दि. १/९ /२०२५:-
शासकीय सेवेत नियमित समायोजन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य अनेक मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. चौदाव्या दिवशीही महाराष्ट्र राज्य शासन आणि मंत्री , आमदार, खासदार बेशरमपणे झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काम बंद आंदोलनात गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास १२०० कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यात सहभागी झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यविषयक कामकाज फारच प्रभावित झाले आहे. तरीही महाराष्ट्र राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर बेशरमपणे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिवाशी.. आयुष्याशी निर्दयीपणे खूप वर्षापासून खेळत आहे. आतापर्यंत अनेकदा आश्वासने देऊन लाॅलीपाप दाखवले आहे. शासनाच्या खोट्या आश्वासनालाही आतापर्यंत अनेकदा आरोग्य कंत्राटी कर्मचारी बळी पडले आहेत. मात्र आता बळी पडण्याची गरज नाही.
गडचिरोलीची जनता पुरामुळे त्रस्त, पालकमंत्री फडणवीस कार्यक्रमात व्यस्त आहेत.
१४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. परंतू सव्वा वर्ष होऊनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्य शासन आणि शासनाच्या अखत्यारित काम करीत असलेले वरिष्ठ पदांवर काम करित असलेले नालायक, बेशरम अधिकारी अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करित आहेत. इतके नालायकपणाचे आणि बेशरमपणे शासन वागत आहे. शिवाय मानधनवाढही देण्यात आलेली नाही. बदली धोरण, ईपीएफ, इन्शुरंस इत्यादी मागण्याही मंजूर झालेल्या नाहीत. यासंदर्भात ८ व १० जुलै २०२५ रोजी आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
या आंदोलनात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, समुपदेशक, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांतर्गत सर्व अहवाल देणे बंद, लसीकरणासह ऑनलाईन व ऑफलाईन कामेही बंद ठेवण्यात आली असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन सुरु केल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे.
No comments