Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजेंद्र फंड यांची निवड:

 साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदी  राजेंद्र फंड यांची निवड:  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- जग बदलण्यास...

 साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदी  राजेंद्र फंड यांची निवड:



 अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-


जग बदलण्यासाठी लिहा, अन्यायाविरुद्धं लिहा असा जगाला संदेश देणारे जागतिक कीर्तीचे लेखक साहित्यरत्न डॉ . अण्णा भाऊ साठे यांचे स्मरणार्थ श्रीरामपूर येथे लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दि. 31 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ .अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक राजेंद्र फंड यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा या संमेलनाचे प्रमुख संयोजक लोककवी बाबासाहेब पवार यांनी दिली आहे.  

            शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर येथे  साहित्यरत्न डॉ . अण्णा भाऊ साठे एकदिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात येणार असून या संमेलनात  भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून यात  , उद्घाटन सोहळा, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद, शाहिरी जलसा व समाजात विशेष कामगिरी बजावणाऱ्या साहित्यिक व समाजसेवकांचा पुरस्कार वितरण सोहळा ,त्याचबरोबर  कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून अनेक कवी ,साहित्यिक, साहित्य रसिक,  विचारवंत या संमेलनास हजेरी लावणार आहेत. ग्रामीण भागात साहित्याची गोडी नवसाहित्यिकांना व नवकवींना लावण्यासाठी व नव्या व प्रतिथयश  साहित्यिकांना एकत्र आणून हा साहित्याचा जागर वेगवेगळ्या स्वरूपात वर्षभर  घेण्याचा उपक्रम ही संस्था सतत करत आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळात ही संस्था साहित्याची कार्यशाळा म्हणून ही प्रसिद्ध  आहे. 

                या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री. राजेंद्र फंड हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे  प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते " ग्रामसेवा संदेश" हा दिवाळी अंक काढतात. त्यांची आतापर्यंत देडगाव चा बालाजी हे धार्मिक पुस्तक व त्यावर टेली फिल्म त्याचबरोबर आरोग्यावर आधारित ध्यास हागणदारी मुक्तीचा, चिकूनगुनिया, फायदे एन. आर. एच. एम. चे, हे गीतसंग्रह साहित्य प्रसारित असून होंडा ही कादंबरी, रखमाने केले निर्मलग्राम ही एकांकिका, तंटामुक्ती हा गीतसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आजपर्यंत अनेक पुस्तकांचे परिक्षण, कवितांचे रसग्रहण, त्यांनी केले आहे.  इतिहास  संशोधनाचे  अनेक शोध निबंध लिहिले असून ते वेगवेगळ्या राज्यस्तरीय इतिहास परिषदेत वाचन केले आहे. लायन्स क्लबच्या अनेक वरिष्ठ पदावर त्यांनी काम  करून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. 

                    अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्याचबरोबर विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे ते स्पर्धाप्रमुख असून या स्पर्धेचे ते परीक्षक ही आहेत.  दोन वेळा अखिल भारतीय स्तरावरील कवितेचे रसग्रहण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. संत संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष म्हणून राहिले आहेत. नुकतेच त्यांची पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ही निवड झाली आहे. साहित्याच्या अनेक प्रकारात ते परीक्षक म्हणून नेहमी जबाबदारी पार पडतात. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित झाले आहे.

             साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलसंत द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव कविवर्य बाळासाहेब कोठुळे,

 संपादक श्री. राजेंद्र देसाई, संपादक श्री.  महादेव दळे, संपादक श्री. बाळासाहेब  जाधव,  संपादक श्री. राजेंद्र नारायणे, पत्रकार सुधीर चव्हाण,  ढाकणे एज्युकेशन संस्थेचे श्री. एकनाथराव ढाकणे,  ला. गिरीश मालपाणी, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे  संस्थापक ला. विनोद गाडेकर व सर्व टीम, झोन  चेअरमन ला. संजय उबाळे, ला. गायत्री म्हस्के, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, संस्थापक  सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, प्राध्या. अशोक कानडे, सुभाष सोनवणे, ऐश्वर्याताई सातभाई, प्राध्या. संजय दवंगे, हेमचंद्र भवर,  ऋता  ठाकूर, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहन गायकवाड, श्री. मनोहर कड, श्रीम . रंजना जोशी, श्री. गोरक्षनाथ फंड, श्री. गणेश चणे, श्री. पुरुषोत्तम साळुंके, श्री. माधवराव देसाई, श्री.  अनिल देसाई, श्री. सुधाकर वाघ,श्री. सुनील निकम,श्री.  विलास रोकडे, श्री. सागर रोकडे यांनी अभिनंदन केले आहे.

No comments