भारतीय संस्कृती जीवन संस्काराचा एक आदर्श वस्तू पाठ आहे -उद्धव महाराज मंडलिक मातृत्व सेवेचे नवे मापदंड शोधणारा नंदकुमार आहेर कलियुगातील ...
भारतीय संस्कृती जीवन संस्काराचा एक आदर्श वस्तू पाठ आहे -उद्धव महाराज मंडलिक
मातृत्व सेवेचे नवे मापदंड शोधणारा नंदकुमार आहेर कलियुगातील "श्रावण बाळ'
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
माया अमृताचा धडा
माय प्राजक्ताचा सडा
माय रोज शिकविते
मला जीवनाचा धडा
कवी प्रशांत केंदळे नाशिक यांच्या वरील ओळींचा अर्थ नंदकुमार आहेर याच्या जीवनाशी त्यांच्या आईने केलेल्या संस्काराशि व शिक्षणाशी निगडित आहे. त्यांच्या मातोश्री सुभद्रबाई आहेर यांचे नुकतेच सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन आव्हाने येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रसिद्ध कीर्तनकारह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते म्हणाले
आई-वडिलांना देव मानणारी आपली आदर्श भारतीय संस्कृती जीवन संस्काराचा एक आदर्श वस्तूपाठ आहे. महाभारत, रामायण आणि इतिहासामध्ये अनेक आदर्श माता आहेत ज्यांनी असह्य दुःख यातना सहन करून समाजाला दिशा देणारे पुत्र घडवले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परमार्थिक संस्कार लाभलेल्या आव्हाने येथील आहेर परिवाराने आयोजित केलेला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा अतिशय स्तुत्य आहे.
असे प्रतिपादन सद्गुरु नारायणगिरी महाराज संस्थानचे महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी केले. देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आईची पूजा करून देव मिळवता येतो. देव आणि आई एकच नाण्याच्या दोन बाजू, देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं या वाक्याचा प्रत्यय आज नंदकुमार आहेर यांच्या मातोश्री सुभद्राबाई आहेर यांच्या सहस्त्रदर्शन सोहळ्यानिमित्त प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. आई कोणाचीही असो मग रामाची असो की शामची, कैकयी असो की गांधारी, आई सगळ्यांची सारखीच असते.
आव्हाने येथील नंदकुमार आहेर यांनी आपली सेवापूर्ती व मातेच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त शास्त्रानुसार श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ वाराणसी उत्तर प्रदेश येथील शिवम देवा चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली यथासांग पूजा विधी पार पाडला.
गंगा स्नान ,होम हवन, सवाद्य मिरवणूक, वृक्षरोप व बंकटस्वामी भजनीमालिका ग्रंथ वाटप आदी कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले. यावेळी मातोश्रींची ग्रंथ व पेढेतुला करण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित माननीय आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात आपले कर्तृत्व प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आई-वडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात. आव्हाने येथील आहेर परिवाराने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. मातृ-पितृभक्ती समाजामध्ये रुजणे ही काळाची गरज आहे. जीवनात किती धन कमावले हे महत्त्वाचे नसून किती माणसे जोडली हे महत्त्वाचे असते. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर पत्रिका पाहून अमेरिकेतील रहिवासी निरंजन इंदोले यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या असून नंदकुमार आहेर यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
यावेळी निलेश महाराज वाणी ,सोमेश्वर महाराज गवळी ,घनश्याम महाराज शिंदे, बाबासाहेब महाराज जगताप, अशोक महाराज निर्मळ , शिवाजी राजळे ,उद्धव वाघ, राहुल राजळे , बबन भुसारी, अंबादास कळमकर प्राचार्य राजधर टेमकर,शिवशंकर राजळे, शिवाजी भुसारी, दिलीप देवा सुलाखे शिर्डी यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
No comments