गाव खेड्याकडून आंदोलन करत्या मराठ्यांना खाद्याची रसद अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- मुंबई येथीलआझाद मैदानावर होत असलेल्या मराठा आंद...
गाव खेड्याकडून आंदोलन करत्या मराठ्यांना खाद्याची रसद
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
मुंबई येथीलआझाद मैदानावर होत असलेल्या मराठा आंदोलनासाठी गेलेल्या लाखो लोकांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गावागावातून चटणी भाकरी गोळा करून मुंबईकडे रवाना केल्या जात आहेत. पाथर्डी तालुक्यातील चितळी या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी आंदोलकांच्या खाण्यापिण्यासाठी लोक सहभागातून भाकरी ,दसमी, चिवड्याची पाकीट तयार करून मुंबईकडे पाठवण्याची तयारी केली आहे. गावातील अनेक तरुण एकत्र येत सर्व स्वयंपाक महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वयंपाकाची जय्यत तयारी केली. व खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पो मुंबईकडे घेऊन काही तरुण रवाना झाले आहेत. तसेच शेवगाव तालुक्यातील
अमरापूर, शहाजापूर,सुलतानपूर
( फलकेवाडी),भगूर येथील गावकऱ्यांनी चटणी भाकरी देण्याचे आवाहन समस्त पंचक्रोशीतील लोकांना केले.त्यानुसार घराघरातून भाकरी करून त्या जमा करण्यात आल्या.सोबत पाणी बॉटल बॉक्स सुद्धा देण्यात आले.
भाकरीनी भरलेली गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली असून तिथे आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठ्यांना ही रसद पुरवून ग्रामस्थानी आपल्या एकीचे दर्शन तर घडवलेच सोबत आंदोलन करणाऱ्या लोकांना बळ देण्याचे काम केले आहे.
त्यानुसार मराठा आरक्षण मिळावे म्हणून लाखो लोक मुंबईमध्ये दाखल झाले असून त्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होणार नाही यासाठी लोकांनी उत्स्फूर्त केलेल्या या नियोजनाचे परिसरातून कौतुक होत आहे.
No comments