Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

अजय गणवीर यांना महापौर पुरस्कार जाहीर

 अजय गणवीर यांना महापौर पुरस्कार जाहीर अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-  सुप्रसिद्ध कवी,लेखक,शैक्षणिक, सामाजिक चळवळीत काम करणारे,विद्य...

 अजय गणवीर यांना महापौर पुरस्कार जाहीर



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

 सुप्रसिद्ध कवी,लेखक,शैक्षणिक,

सामाजिक चळवळीत काम करणारे,विद्यार्थी प्रिय शिक्षक, एच/पश्चिम विभागातील खारदांडा हिंदी मुंबई पब्लिक शाळा खार पश्चिम येथे प्रशि.शिक्षक पदावर कार्यरत अजय शिवराम गणविर यांना नुकताच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित आणि सर्वोच्च महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे. 

    दरवर्षी शिक्षणमंत्री,महापौर आणि शिक्षणाधिकारी या मान्यवरांच्या शुभहस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सुमारे 50 गुणवंत शिक्षकांना महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.यावर्षी मुंबईचे पालकमंत्री व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

    धान्यनगरी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत येणारे असईटोला या छोट्याशा खेडे गावातून आलेल्या ध्येयवेड्या,उपक्रमशील युवक शिक्षकाचा मुंबईत महानगरपालिके कडून सन्मान होणार आहे. ही बाब अतिशय आनंददायी आणि अभिनंदनीय आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा मुंबईत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

    अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या शेतमजूर कुटुंबातील या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जीवनात आलेल्या अनेक समस्यावर मार्ग काढत इथपर्यंतच्या यशस्वी प्रवास केला आहे.ही बाब गोंदिया जिल्ह्यातील तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्शवत आहे.अजय गणवीर यांना यंदाचा  महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments