माणसाचे कर्तृत्व पूजनिय असावे : ह. भ. प. लक्ष्मण महाराज भवार . अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- माणसाचे कर्तृत्व पुजनिय असावे स्वतःच्...
माणसाचे कर्तृत्व पूजनिय असावे : ह. भ. प. लक्ष्मण महाराज भवार .
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
माणसाचे कर्तृत्व पुजनिय असावे स्वतःच्या कार्याने माणूस अजरामर राहत असतो, असे प्रतिपादन ह. भ. प. लक्ष्मण महाराज भवार यांनी केले. सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे (भाऊ ) यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन दादापाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर येथे करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. संत साहित्याचा सामाजिक संस्कार, या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की , संपूर्ण विश्वाचा विचार संत साहित्यातून केला गेला आहे. विकारांमुळे माणसे बेकार होत असतात तेव्हा तरुणांनी व्यसनापासून नेहमी दूर राहावे जगाला आज धना पेक्षा संस्काराची जास्त गरज आहे. समाजात परिवर्तन घडवण्याची शक्ती संत साहित्यात असते. असेच स्वतःच्या कार्याच्या जोरावर व सचोटीवर संतत्वाला प्राप्त झालेले स्व. दादापाटील राजळे यांच्या विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले. त्यांनी स्व. भाऊंच्या कार्यांचा व व्याख्यानमालेचा आढावा घेतला. स्व. सौ. चंद्रभागाबाई सर्व सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव राजळे यांनी भविष्याचा वेध घेत नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राहुल दादा राजळे हे होते. याप्रसंगी रामकिसन काकडे , सुभाषराव ताठे,विक्रमराव राजळे, कुशिनाथ बर्डे, बाबासाहेब किलबिले, अरुणराव आहेर, आर. जे. महाजन, भास्करराव गोरे , ह. भ. प. दत्तात्रय महाराज राजळे, ह. भ. प. अर्जुन महाराज चितळे, विद्यार्थी - विद्यार्थिनी, पालक सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन डॉ.किशोर गायकवाड, प्रा.राजेंद्र इंगळे, प्रा. दुर्गा भराट यांनी केले. सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अथक परिश्रम करून ही व्याख्यानमाला पूर्णत्वास नेली. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते .
No comments