डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी व तंत्र विद्यालयात बोधचिन्ह व दीपस्तंभाचे आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते अनावरण अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब ...
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी व तंत्र विद्यालयात बोधचिन्ह व दीपस्तंभाचे आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते अनावरण
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव (आदिनाथ नगर )येथील
डॉ .अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालय , आदिनाथनगर येथे आज दीपस्तंभ व बोधचिन्हाचे अनावरण शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या मा . आ .मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले , युवकांचे प्रेरणास्थान मा.आ . स्व. राजीवजी राजळे , हरितक्रांतीचे प्रणेते व मा . केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ . अण्णासाहेब शिंदे तसेच सहकार व मानवतेचा चिरंतन प्रेरणा स्तोत्र व शिक्षण महर्षी स्व .दादापाटील राजळे ( भाऊ ) यांनी समाजासाठी , कष्टकऱ्यांसाठी प्रकाशाचा दीप प्रज्वलित करून दिला .
या महात्म्यांच्या त्यागाचे व समर्पनाचे निरंतर स्मरण येणाऱ्या प्रत्येक पीढीला व्हावे याकरीता कृषि विद्यालयाच्या मध्यवर्ती परिसरात दीपस्तंभ उभारण्यात करण्यात आला आहे .
याप्रसंगी श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा वृ . सह .सा .का . लि . आदिनाथनगरचे व्हाईस चेअरमन श्री .रामकिसन पा .काकडे , विश्वस्त श्री . उद्धवराव वाघ, श्री . सुभाषराव ताठे, विक्रमराव राजळे , प्राचार्य डॉ . राजधर टेमकर , कृषि विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पानखडे व कृषि तंत्र विद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .
No comments