ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारताचा दबदबा : डॉ,काशिनाथ देवधर अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारताच्या संरक्षण व...
ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारताचा दबदबा : डॉ,काशिनाथ देवधर
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारताच्या संरक्षण विभागाचा डंका वाजला असून जगात एक प्रकारचा दबदबा निर्माण झाला असल्याचे मत डी.आर.डी.ओ मधून निवृत्त झालेले संचालक, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांनी व्यक्त केले . सहकार महर्षी स्व . दादापाटील राजळे (भाऊ ) यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे व्याख्यान "ऑपरेशन सिंदूर व संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत" या विषयावर ते बोलत होते. मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांचे सोबत काम केल्याचे अनेक फायदे जीवनात झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या देशभक्ती व राष्ट्रप्रेमाच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. संरक्षण क्षेत्रात लागणारी अत्याधुनिक संसाधन सामग्री व शस्त्रास्त्रे यांच्या विषयी त्यांनी मुलांना चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. भारताने कुणाच्याही मदतीशिवाय स्वदेशी बनावटीने विकसित केलेले अनेक क्षेपणास्त्र त्यांच्या वैशिष्ट्यांसह व प्रत्यक्ष पडद्यावर पाहून मुलांना एक वेगळीच अनुभूती आली. जो देश स्वबळावर आपले संरक्षण करू शकतो, स्वतःची शस्त्रे तयार करून त्यावर पूर्ण विश्वास ठेवून काम करतो. त्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणताही देश पाहू शकत नाही. ऑपरेशन सिंदूर ही एक नवीन भारताची ओळख संपूर्ण जगाला झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शस्त्र बनवण्याचे आव्हान स्वीकारून संरक्षण दलाला सहाय्यभूत ठरणारी शस्त्रांचे संशोधन करून सैन्याला दिल्याचे त्यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांना डीआरडीओ मध्ये असलेल्या संधींचीही माहिती त्यांनी दिली व डीआरडीओ कडे विद्यार्थ्यांना जाण्यास प्रोत्साहित केले.
याप्रसंगी प्रांत संचालक मा.नानासाहेब जाधव ,मा. शिरीष शिवणगीकर , मा. रामनाथ वायकर मा.अरविंद पारगावकर, सौ. विमलताई नानासाहेब जाधव, सौ. पद्माताई ईट्टम , डॉ.भा. ह. देशमुख,. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक मा. उद्धवराव पा.वाघ हे होते. त्यांनी स्व. भाऊंच्या कार्याला उजाळा देऊन भाऊंच्या कार्याच्या कामाच्या अनेक आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एम. एस. तांबोळी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य अशोक काळे यांनी केले. याप्रसंगी मा. राहुलदादा राजळे, मा. काशिनाथ पा. लवांडे, सुभाषराव ताठे, मा.रामकिसन काकडे, मा. शेषराव कचरे , नारायण काकडे, मा.बाबासाहेब किलबिले , प्राचार्य डॉ. शांताराम खणगे, प्राचार्य सुनील पानखडे, मा. विक्रम राजळे,मा.भास्करराव गोरे,मा. आर. जे. महाजन,तसेच परिसरातील अनेक मान्यवर ,माजी सैनिक, पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ, किशोर गायकवाड, प्रा. राजेंद्र इंगळे प्रा.दुर्गा भराट यांनी केले.
No comments