मूल्याधिष्ठित समाज उभा करणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हेतू - डॉ. पराग काळकर(कुलगुरू-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अहिल्यानगर प्रतिन...
मूल्याधिष्ठित समाज उभा करणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हेतू - डॉ. पराग काळकर(कुलगुरू-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
मूल्य आधारीत नागरिक व मूल्य धारक समाज उभा करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे प्रतिपादन प्र - कुलगुरू डॉ, पराग काळकर यांनी व्यक्त केले. सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे (भाऊ) यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वेगवेगळ्या माध्यमातून युवकांपर्यंत ज्ञान पोहोचवणे, भारतीय अभ्यासक्रमाचे प्रामाणिकीकरण करणे , संशोधनाला महत्त्वप्राप्त करून देणे , मूल्य आधारित नागरिक तयार करणे व चांगला माणूस तसेच चांगला समाज घडवणे अशी सर्व कामे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केली जाणार आहेत. शिक्षणाविना समाज घडवणे शक्य नाही. वैचारिक बैठक तयार कण्याचे काम शिक्षण करत असते. भावना विकणारे शिक्षण महत्त्वाचे नाही तर या देशाचे नागरिक म्हणून आपली भूमिका सचोटीने व प्रामाणिकपणे पार पाडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. विचार संतुलित ठेवण्याचे काम शिक्षणामुळे होत असते. ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा तसेच ज्ञानाचे रूपांतर कार्यात करता आले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे स्वायत्त संस्थांनी स्थानिक अडचणी लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येईल यावर संशोधन करावे असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षण संस्थेला केले. काळाची पाऊले ओळखून स्व. दादापाटील राजळे यांनी जे शैक्षणिक संकुल उभा केले तसेच त्यांच्या नंतरही निरंतन शिक्षणचा प्रवाह चालू ठेवल्यामुळे परिसरातील अनेकांना विशेषतः विद्यार्थिनींना शिक्षणाचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज देशात साडेतीन ते चार कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना एका सूत्रात गुंफण्याचे काम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करता येऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी स्व. भाऊच्या कार्याच्या
आठवणी सांगून, नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्व सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले तर आभार डॉ. जनार्दन नेहूल यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . किशोर गायकवाड , प्रा. राजेंद्र इंगळे, प्रा. दुर्गा भराट यांनी केले. कार्यक्रमास मा. रामकिसन काकडे, मा.उद्धवराव वाघ , मा, सुभाषराव बुधवंत, कुशिनाथ बर्डे काकासाहेब शिंदे, सचिव आर . जे . महाजन रामकिसन काकडे , राहुल दादा राजळे , कुशिनाथ बर्डे, भास्करराव गोरे, देवराम भोईटे, सुनील पुंड, डॉ.पी. जी. ढाकणे डॉक्टर चौरे विक्रमराव राजळे, विद्यार्थी - विद्यार्थिनी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
No comments