Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

सार्वजनिक गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात संपन्न व्हावेत-विलास पुजारी (पोलीस निरीक्षक)

 सार्वजनिक गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात संपन्न व्हावेत-विलास पुजारी (पोलीस निरीक्षक) अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-सार्वजनिक गणेश...

 सार्वजनिक गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात संपन्न व्हावेत-विलास पुजारी (पोलीस निरीक्षक)



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा २०२५ भक्तीमय व शांतता प्रिय वातावरणामध्ये सर्व गणेश तरुण मंडळाने पार पाडावे, सार्वजनिक शांततेला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही याची दखल सर्व गणेश मंडळांनी घ्यावी व सामाजिक सलोख्याचा संदेश या उत्सवांमधून द्यावा असे आव्हान पाथर्डी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. विलास पुजारी साहेब यांनी दिली आहे.



      15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता पाथर्डी पोलीस स्टेशन येथे आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पाथर्डी शहरातील मानाचे समजले जाणाऱ्या आठ गणपती व इतर मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. गणेश उत्सव शांततेत व सुरक्षित पार पाडण्याच्या संदर्भात चर्चा झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य त्या सूचना सर्व मंडळांना देण्यात आल्या त्यामध्ये सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ती वेळेच्याआत पूर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच कायद्याने बंदी असलेल्या डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये पारंपरिक ढोल ,ताशा व इतर वाद्याचा वापर करावा तसेच लेझर सारख्या घातक लाईटचा वापर कुठल्याही मंडळांनी करू नये . मिरवणुकीच्या दरम्यान नैसर्गिक गुलालाचा वापर करावा ,केमिकल युक्त गुलाल , रांगोळी , कचकडी यांचा वापर मिरवणुकीत टाळावा. शासनाने घालून दिलेले ध्वनी पातळीची मर्यादा प्रत्येक मंडळाने पाळावी, तसेच दोन्ही साधनांचा निर्धारित वेळेतच वापर करावा. रस्ता वाहतुकीची कोंडी होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. गणेश विसर्जन करताना पर्यावरण पूरक पद्धतीचे पालन करावे व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. सांस्कृतिक कार्यक्रमामधून सामाजिक संदेश द्यावेत. महिला व जेष्ठ नागरिक यांच्या बाबत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी या काळात अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच मिरवणूक पूर्ण करावी. जेणेकरून वाद- विवाद होणार नाहीत व सार्वजनिक शांतता राखली जाईल, तसेच पोलीस प्रशासन व माननीय उच्च न्यायालयाचे आदेश व कायदा सुव्यवस्थेचे आदर्श पालन या मंडळाकडून केले जाईल , अशा पहिल्या तीन क्रमांकाच्या गणपती मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे दोन मंडळांना प्रोत्साहन पर प्रशस्तीपत्रक दिले जाईल. तेव्हा सर्व गणेश उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी व नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये व शांतता आणि सुरक्षितता तसेच सुव्यवस्था राखण्यास मदत करावी असे आव्हान पाथर्डी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी दिली आहे.

No comments