पाथर्डी तालुक्यातील लोहसर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पसायदान कडून दप्तराचे मोफत वाटप अहिल्यानगर प्रतिनिधी...
पाथर्डी तालुक्यातील लोहसर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पसायदान कडून दप्तराचे मोफत वाटप
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- 15 ऑगस्ट रोजी पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सोनई येथील पसायदान सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले. पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था सोनईचे उपाध्यक्ष विनायक दरंदले सचिव संजय गरजे रमेश घाटोळे संदीप घोलप यांनी विद्यार्थ्यांसाठी दप्तर दिले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. सकाळी प्रभातफेरी , ध्वजारोहण , विद्यार्थ्यांची भाषणे , मोफत दप्तर वितरण , विद्यार्थ्यांनी सादर केलेली कवायत , ग्रामस्थांची भाषणे असे भरगच्च कार्यक्रम या निमित्ताने पार पडले.
अध्यक्षस्थानी आदर्श गाव लोहसरच्या सरपंच हिराताई अनिल गिते या होत्या. त्या म्हणाल्या की शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे . शाळेच्या काही अडीअडचणी असतील तर त्या निश्चित सोडवल्या जातील. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन अनेक अधिकारी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. ग्रामपंचायत कडून शाळेला सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब वांढेकर म्हणाले की शिक्षक व शाळेकडून मिळालेला संस्काराचा ठेवा तसाच न ठेवता योग्य वेळी त्याचा वापर करा. पोलीसपाटील नामदेव वांढेकर यांनी पालकांना आवाहन केले की आपली मुले आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतच पाठवा.आपल्या शाळेचा दर्जा उत्तम आहे. बाहेर मोठ्या प्रमाणात फी भरून पैसा वाया घालू नका.
गावातील आदर्श शिक्षक बाळासाहेब वांढेकर यांनी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी रोख रक्कम दिली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक महादेव कौसे यांनी केले .सूत्रसंचालन रविंद्र आंधळे यांनी केले. तर आभार मुक्ताबाई सुपेकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बद्री घुगरे , प्रशांत दगडखैर , बाबू चोपडा , मंगेश गिते , राम वारे , मारुती वारे , अंगणवाडीताई आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments