मा. श्री. आप्पासाहेब राजळे पाटील ( काका) यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ न...
मा. श्री. आप्पासाहेब राजळे पाटील ( काका) यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील
आदिनाथ नगर येथील दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय येथे मा. आमदार श्री अप्पासाहेब राजळे पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. रामकिसन काकडे पाटील हे होते. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी माननीय आप्पासाहेब राजळे पाटील तथा काका यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी भूषविलेली विविध पदे आणि पाथर्डी तालुक्यासाठी केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी श्री उद्धवराव वाघ यांनी काका शंभरी सहज पार करतील असा विश्वास व्यक्त केला व पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये महाविद्यालयातील सर्व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक श्री. उद्धवराव वाघ पाटील, डॉ. यशवंत गवळी, श्री. नारायणराव काकडे, श्री. श्रीकांत मिसाळ, श्री शेषराव ढाकणे, श्री सुभाषराव ताठे पाटील, श्री सुभाषराव बुधवंत , श्री बाळासाहेब गोल्हार , श्री भास्करराव गोरे , अण्णासाहेब कृषी विद्यालयाचे प्राचार्य सुनील पानखडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड व प्रा.राजेंद्र इंगळे यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अशोक काळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी व पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते.
No comments