Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

पाथर्डी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

 पाथर्डी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-देवांग कोष्टी समाज अनेक वर्षापासून गुणवं...

 पाथर्डी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न



पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-देवांग कोष्टी समाज अनेक वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा करत आहे. देवांग कोष्टी समाजाचे आराध्य दैवत चौंडेश्वरी मातेच्या कृपाशीर्वादाने पाथर्डीतील आखार भाग परिसरातील चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू किंवा शाळा उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थी व पालकांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामहरी वीर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव कविवर्य बाळासाहेब कोठुळे हे होते. यावेळी विचार मंचावर रामनाथ बंग, सचिन पाटसकर, अमोल कांकरिया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास कांबळे, उपाध्यक्ष कृष्णा रेपाळ ,सचिव किशोर पारखे, खजिनदार गोवर्धन देखने, विश्वस्त-नारायण भागवत, हरिभाऊ वावळ, गजानन भंडारी, तसेच पाथर्डी चे सामाजिक कार्यकर्ते कवी राजेंद्र उदारे, त्यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



   कधीकाळी विणकाम करून उपजीविका करणारा हा समाज होता परंतु काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतर होत गेली. नवीन तंत्रज्ञान प्रगत झाले तसे हातमाग करणारे कारागीर बेरोजगार झाले परंतु पाथर्डीतील या देवांग कोष्टी समाजाने हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले काहींनी मशीन काम करून टेलरिंग व्यवसायामध्ये प्रगती केली तर काही वेगवेगळ्या दुकानदारीमध्ये पाऊल ठेवून यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचले. तर काही नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडले, आर्थिक दृष्ट्या आज या समाजाने समृद्धीकडे वाटचाल केली आहे. जे आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले त्यांनी समाज बांधवांच्या उद्धाराकरता आर्थिक योगदान देत काही रक्कम बँक खात्यामध्ये ठेवली व त्या व्याजाच्या रकमेवर असे प्रेरणा देणारे कार्यक्रम घेऊन आपल्या समाजाला ऊर्जा देण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यावेळी सुवर्ण चंद्रकांत शिळवणे(आरोग्य सेविका), शुभांगी शैलेश उगार (विद्युत सहाय्यक), तेजस अशोक खोले (विद्युत सहाय्यक) तसेच महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले चिरंजीव सिद्धार्थ सुदाम देखणे-९८.०९, कुमारी संस्कृती सोमनाथ भागवत ९३.७६, कुमारी श्रेया गणेश भागवत ८४.१४ या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये विशेष सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाबरोबरच त्यांना दप्तर, वह्या, पुस्तक, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजीत भागवत, कृष्णा रेपाळ ,अमोल सोळशे, गणेश रोकडे, अमोल खोले, अमोल भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई असलकर, सुनिता ताई उदबत्ते , उज्वला सरोदे, रत्नमाला भागवत, वर्षा गुरसाळी, स्वाती भागवत, सारिका इधाटे, यांचे सह विद्यार्थी, विद्यार्थिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments