शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का? अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे+ शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे...
शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे+
शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देशाचे भवितव्य शाळेतूनच घडत असते. कारण या शाळेत देशाच्या आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो म्हणून याच माध्यमातून संपूर्ण समाज घडत असतो. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका निभवत असतो. ज्याप्रमाणे कुंभार मातीला हवा तसा आकार देऊ शकतो आणि त्या मातीला सुंदर,आकर्षक बनू शकतो त्याच प्रकारे शिक्षक सुद्धा मुलांच्या शारीरिक मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास करण्याचा कार्य नेहमी तो करत असतो. अर्थात समाज घडविण्याचा कार्य निरंतर करत असतो. आदी काळापासून तर आजपर्यंत शिक्षण हे सर्वांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या तसेच प्रत्येकाला आपल्या जीवनात यश प्राप्ती करण्यासाठी आणि योग्य बदल घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत प्रभावी साधन मानले जात आहे. शिक्षण हा मानवी उत्क्रांतीच्या महत्त्वाच्या घटक आहे. त्यामुळे सृजनशीलता व नवकल्पनाच्या विकास होत असतो, म्हणून असेही म्हटले जाते की चांगले शिक्षण हा एक सभ्य जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे. आजच्या आधुनिक युगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिलेला आहे. शिक्षण घेत असताना व शिक्षण देत असताना सध्याच्या काळात संपूर्ण शिक्षण पद्धतीच बदललेली दिसत आहे.
आधीच्या काळात शिक्षकांना ज्ञानदान करणे हेच कार्य होते परंतु आधुनिकतेच्या काळात पदार्पण करत असताना शिक्षकांवर शैक्षणिक कार्य कार्याच्या सोबत अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहे. काही वर्षां पूर्वी ची शैक्षणिक स्थिती पाहता आणि आजची शैक्षणिक स्थिती पाहता आपल्याला या दोघांमध्ये खूप मोठा फरक आढळतो. पूर्वीचे शिक्षक हे अत्यंत बुद्धिमान आणि हुशार होते त्याचप्रमाणे आजचे शिक्षक सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. परंतु आधीचे शिक्षक ज्या प्रकारे अध्यापन कार्य करीत होते किंवा विद्यार्थी घडवित होते त्याचप्रमाणे आजचा शिक्षक हा तसा अध्यापन करू शकत नाही किंवा तसे विद्यार्थी घडवू शकत नाही. या मागचे कारण आपल्याला शोधायला पाहिजे. जर विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवायच्या असेल तर सध्या चालेला शैक्षणिक पद्धती व अनेक कार्य , गोष्टीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. अन्यथा शिक्षण केवळ व्यवसाय करणे एवढेच मर्यादित राहील म्हणून शिक्षकांना खालील गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आहे.
अध्यापन पद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य- शिक्षक हा समाजातील महत्त्वाच्या घटक आहे. त्याच्या हातून नेहमी निरंतरपणे समाज घडत असतो. अध्ययन-अध्यापन कार्य करत असताना शिक्षकाला अनेक शिक्षण पद्धतीचे निवड करायला लागतात. परंतु सध्या चौकटीमध्ये राहून शिक्षकांना शिक्षण पद्धतीचे वापर करून वर्ग अध्यापन कार्य करावे लागतात. त्यामुळे वर्ग अध्यापन त्या पद्धती पर्यंतच मर्यादित राहते. म्हणून शिक्षकांना शिक्षण पद्धती निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. जेणेकरून तो विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देऊ शकणार. तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा व क्षमतेनुसार शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करू शकणार.
पाठ्यक्रम निर्मितीचे व निर्धारणाचे स्वातंत्र्य - वर्गात शिकत असलेले विद्यार्थी हे कोणत्या क्षेत्रातील आहेत? त्याची पार्श्वभूमी काय आहे? हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक भावनिक व मानसिक स्थितीला लक्षात घेऊन पाठ्यक्रम निर्मितीचे व निर्धारणाचे स्वातंत्र्य शिक्षकांना मिळालाच हवे. जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा व्यवस्थित पणे पूर्ण करू शकतील तसेच विद्यार्थ्यांच्या संबंधित आणि अर्थपूर्ण त्यांना शिक्षण देऊ शकतील.
व्यवसायिक विकास करण्याचे स्वातंत्र्य- सध्याचे युग हे आधुनिक युग आहे आणि या आधुनिक युगात जगाच्या बरोबरीने शिक्षकांना पण बदलणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या या धावते युगात सगळीकडे तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे, म्हणून प्रत्येक शिक्षकांना व्यवसायिक विकास करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. जेणेकरून शिक्षक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती हे शिकू शकतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांचा समोर योग्य प्रकारे तंत्रज्ञानाचे उपयोग करून आणि योग्य पद्धतीचा वापर करून ते वर्ग अध्यापन उत्तम प्रकारे करू शकतील. त्याचबरोबर त्यांच्या कार्याच्या नियोजन आणि व्यवस्थापन हे सुद्धा उत्तम प्रकारे ते करू शकतील
प्रशासनाच्या निर्णयात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास लक्षात घेऊन शासन तर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. असे अनेक योजनांमध्ये शिक्षकांना आपला निर्णय किंवा आपली बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. जेणेकरून शिक्षकांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक , भावनिक व बौद्धिक विकास कसा करता येईल याबद्दल योग्य उपाययोजना हे प्रशासनापर्यंत पोहोचवता येईल.
मूल्यांकनाचे स्वातंत्र्य- सध्याचे हे आधुनिक युगात आहे आधुनिक युगात प्रत्येक शिक्षकांना या जगासमोर, जगा बरोबर स्वतःला अपडेट करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येक शिक्षकांना कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्याचे स्वातंत्र्य हे मिळालाच हवे. जेणेकरून शिक्षक आपल्या कार्याची गुणवत्ता सुधारू शकतील आणि त्याच्या उपयोग वर्ग अध्यापनात ते उत्तम प्रकारे करू शकतील. त्यामुळे वर्ग अध्यापन कार्यात योग्य गती प्रदान मिळण्यास मदत होईल.
शिक्षण संसाधनाचे स्वातंत्र्य- वर्ग अध्यापन करत असताना संसाधने हे महत्त्वाचे घटक मानले जाते. वर्ग अध्यापन करताना संसाधनांचा उपयोग केल्यावर आपला वर्ग अध्यापन कार्य उत्कृष्टपणे व प्रभावी होण्यास खूप मदत होते. विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न लवकर समजण्यात मदत होते आणि त्यांना अधिक वेळेपर्यंत त्यांना स्मरणात राहते. शिक्षण संसाधनेच्या स्वातंत्र्य हे शिक्षकांना मिळाला हवे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना योग्य ती साधने प्रदान करू शकतील व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करू शकतील.
शैक्षणिक स्वातंत्र्य- वर्गात वर्ग अध्यापन करत असताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद होत असतो. या सुसंवादामध्ये शिक्षकाद्वारे अनेक प्रकारचे शिक्षणाची पद्धती, सामग्री आणि शिक्षणाचे ध्येय निश्चित करण्यात येते. शिक्षक आपली शैक्षणिक पातळी वाढवण्याचे प्रयत्न सतत करीत असतो. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात अजून सखोल ज्ञानाची उंची प्राप्त होते.
सामाजिक स्वातंत्र्य- मनुष्य प्रमाणे शिक्षक सुद्धा सामाजिक प्राणी आहे. निरंतर तो समाजामध्ये वावरत असतो आणि समाज घडवण्याच्या कार्य हे शिक्षक नेहमी करत असतो. शिक्षकांना समाजातील विविध समस्यावर भूमिका घेता यावी व त्या समस्येवर आपली मत व्यक्त करता यावी. त्याचप्रमाणे समाजात सुरू असलेली घडामोडी वर मार्गदर्शन करून त्यावर उपाययोजना करता यावी यासाठी सामाजिक स्वातंत्र्य हे शिक्षकांना मिळायला हवे. जेणकरून समाजामध्ये योग्य तो परिवर्तन व बदल घडविणे सोपे होईल. समाजाची शैक्षणिक स्थिती सुधारली की राष्ट्राची शैक्षणिक स्थिती आपोआप सुधारेल.
सदर स्वातंत्र्याचा विचार अध्ययन अध्यापनासाठी करणे ही अत्यंत काळजी गरज आहे. शिक्षण प्रक्रिया सुदृढ करण्यासाठी शिक्षकांना हे स्वातंत्र्य मिळायला हवे. शिक्षकांना स्वातंत्र्य मिळणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक आहे. अध्यापन, मूल्यांकन, अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, प्रशासन आणि व्यावसायिक विकास या सर्व बाबींमध्ये शिक्षकांना स्वातंत्र्य दिल्यास शिक्षण प्रणाली अधिक सक्षम आणि विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील ठरेल. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करून विद्यार्थ्यांना विविध ज्ञानाच्या क्षितिजाशी जोडणे हेच शिक्षक स्वातंत्र्याचे अंतिम उद्दिष्ट आहे.
शिक्षक म्हणजे ज्ञान दानाचा पवित्र मार्ग,
नवभारत रचण्यात करतो महत्वाचे कार्य,
नवीन पिढी घडवूया वापरून नवीन तंत्र,
शिक्षकांना मिळायला हवे सदर स्वातंत्र्य.
✒️अजय शिवराम गणविर
No comments