13/07/2026 रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे आयोजित भव्य सोहळ्यात श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशासकी...
13/07/2026 रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे आयोजित भव्य सोहळ्यात श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशासकीय पोलीस ग्रामीण क्षेत्रामधील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन *सौ.प्रमिला शरद निकम** यांना यंदाचा *"शिवगौरव पुरस्कार – २०२६"* प्रदान करण्यात आला.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार *राजस्थानचे महामहिम राज्यपाल मा. श्री हरिभाऊ (नाना) बागडे* यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
एफ आय सी सी आय मार्फत स्मार्ट पोलीसिंग अवॉर्ड 2025 हा अवॉर्ड देऊन संपूर्ण भारत देशामधून 20 आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोबत सन्मान झाला.तसेच पहिली नॉन IPS अधिकारी असलेली पहिली महिला जिला हा सन्मान मिळाला.
सतरावा नॅशनल लेव्हलचा 'दि प्राइड ऑफ इंडिया-भास्कर अॅवॉर्ड गोवा' या नावाने दिला जाणारा पुरस्कार सौ. प्रमिला शरद निकम यांना देण्यात आला. सौ. निकम या सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. लेडी सिंघम म्हणून ओळख असणाऱ्या सौ. निकम यांच्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट कार्यामुळेच हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
मूळच्या सातारा जिल्ह्यातील असलेल्या सौ. निकम यांचे माहेर सासपडे व सासर कोरेगाव तालुक्यातील जांब त्रिपुटी आहे. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलामध्ये सध्या महिला पोलीस हवालदार या पदावर त्या काम करत असून पो लीस दलामध्ये कर्तव्यावर रुजू झाल्यापासून आजपर्यंत निर्भया पथकाच्या व दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, गावागावांमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून किंवा इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून पालक वर्ग व मुला-मुलींना मोटिव्हेशनल स्पीच, सायबर क्राइम तसेच इतर कायदेविषयक माहिती देण्याचे काम त्यांनी केले आहे. पोलीस दलामध्ये स्वतंत्ररित्या गोपनीय काम करून बीट व महिलांविषयी काम अशा उल्लेखनीय कामगिरीसीठी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कौशल्य विकास मुक्त विद्यालय आणि व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ यांचा २०२२ चा नारीशक्ती पुरस्कार रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
कोरोना कालावधीमध्ये वुमन्स वेल्फेअरच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व योग्य कायदेविषयक माहिती देण्याचे काम त्यांनी केले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्वात मोठ्या साडेतीन
कोटीचे चरस पकडण्याच्या कारवाईमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता.
वेड्या मुलीवर अत्याचार झाल्यावर ससूनमध्ये तिच्या बाळंतपणात तिला मदत करून तिच्यासोबत १३ दिवस रात्रंदिवस थांबून तिचे पुनर्वसन करण्याकरता शिक्रापूर येथील माहेर संस्थेमध्ये त्यांनी तिला स्वखर्चाने दाखल केले. या कामाबाबत ससून रुग्णालयानेही सौ. निकम यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले होते. अशा वेगवेगळ्या कामांमुळे सौ. निकम यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

No comments