Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

चितळीमध्ये नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाने बाल चिमुकल्यामध्ये नवचैतन्य फुलले

 चितळीमध्ये नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाने बाल चिमुकल्यामध्ये नवचैतन्य फुलले पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- पाथर्डी तालुक्यातील चितळी य...

 चितळीमध्ये नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाने बाल चिमुकल्यामध्ये नवचैतन्य फुलले


पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी साहित्याचे वितरण करून या बाल चिमूरड्यामध्ये नवचैतन्य फुलवण्याचे कार्य पुणे येथील डॉक्टर ए. पी.जे. अब्दुल कलाम एज्युकेशनल ग्रुपच्या स्तुत्य उपक्रमामुळे घडवून आले. सामाजिक कार्याने प्रेरित झालेल्या श्री. उद्धव टेमकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या टीमने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करून खारीचा वाटा उचलला. एखादी गोष्ट कानाने ऐकली तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकली तर शब्दा बरोबर गरीबीचा अर्थ समजतो. ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधांपासून संघर्ष करावा लागतो या बाबींचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते उद्धव टेमकर यांनी ग्रामीण मुलांना बरेच सहकार्य करण्याचा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केला. जवळजवळ सहा हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शालेय साहित्य ग्रुपच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील भोसे या गावचे ते रहिवासी असल्यामुळे या तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी भरीव सहकार्य केले आहे.

       या कार्यक्रमासाठी विचार मंचावर अनिल भवार(शिक्षण विस्तार अधिकारी), सुभाष सोनवणे (केंद्रप्रमुख), गणेश वाघ (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दादासाहेब ढमाळ, बाळासाहेब ताठे सर, मदन म्हस्के, संस्कार टेमकर, नितीन अकोलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बर्डे/ गव्हाणे मॅडम, बाळासाहेब वलवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल भवार, सुभाष सोनवणे, बाळासाहेब ताठे, पत्रकार बाळासाहेब कोठुळे, यांच्यासह या कार्यक्रमाचे अध्यक्ष छगन टेमकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम एज्युकेशनल ग्रुपला धन्यवाद दिले. तर सामाजिक कार्यकर्ते उद्धव टेमकर यांनी ग्रुपच्या कार्याचा सविस्तर आढावा सर्वांसमोर विशद करत आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्याचा लेखाजोगा मांडला.

      कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे गुणवंत शिक्षक लदाफ मेहताब , प्रतिभा वस्तारे, अरुण नरवणे, सविता राजपूत यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन बाळासाहेब माने यांनी केले तर सोनाली ससाने यांनी या गोड कार्यक्रमाचे आभार मानले.

No comments