RTO कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप; १६ जूनपासून कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता कोल्हापूर दि. १६ जून : मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटना...
RTO कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप; १६ जूनपासून कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
कोल्हापूर दि. १६ जून : मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, दि. १६ जून २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. संघटनेने याबाबतची अधिकृत घोषणा केली असून राज्यातील RTO कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सेवा प्रवेश नियम तातडीने जारी करणे, आकृतिबंधाची अंमलबजावणी करणे, ५६ कर्मचाऱ्यांची मागे घेतलेली पदोन्नती पूर्ववत करणे, प्रशासकीय पदांवरील प्रलंबित बढत्या देणे, बढतीपूर्व नियमबाह्य परीक्षा रद्द करणे, १०-२०-३० कालबद्ध सेवांतर्गत लाभ लागू करणे तसेच पदांचे नामकरण बदलणे या मागण्यांचा समावेश आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार या मागण्यांकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. संपामुळे वाहन नोंदणी, परवाना नूतनीकरण, वाहन हस्तांतरण, फिटनेस तपासणी आदी विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, प्रशासन आणि कर्मचारी संघटनेदरम्यान तोडगा निघण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत असून नागरिकांना आवश्यक कामांसाठी पर्यायी व्यवस्था किंवा अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
— अभिजित पाटील, योगदान प्रतिनिधी







No comments