चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही- अण्णा पाटील सर कोल्हापूर वार्ताहर -नारायण लोहार सोनुर्ले , तालुका शाहूवाडी जि.कोल्हापूर ...
चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही- अण्णा पाटील सर
कोल्हापूर वार्ताहर -नारायण लोहार
सोनुर्ले , तालुका शाहूवाडी जि.कोल्हापूर येथील करणसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय सोनुर्ले या विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव अण्णा पाटील सर यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की,
आजच्या काळामध्ये श्रीमंती व प्रॉपर्टी पेक्षा आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले आरोग्य राहण्यासाठी क्रीडा स्पर्धा माध्यमातून शरीराचा व्यायाम होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही. शारीरिक हालचाल हा मनुष्याचा जगण्याचा मूलमंत्र आहे. नैसर्गिक हालचाल मानवाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. सध्याचे विद्यार्थी मोबाईलमध्ये जास्त गुंतून राहिल्याने त्यांचा व्यायाम होत नाही. उलट मेंदूवर ताण येतो त्यामुळे हे विद्यार्थी सैरभैर होतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे. शारीरिक व्यायाम नियमित केला पाहिजे. तरच त्यांचे आरोग्य चांगले राहील.यावेळी संस्थेचे सचिव व सरपंच बी .एच .कांबळे मुख्याध्यापक पाटील सर, शिक्षक कांबळे सर, मोहिते सर, पाटील सर व शिक्षिका पाटील मॅडम तसेच संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.शेवटी मुख्याध्यापक पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments