*महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांचे मार्फत इ.5 वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापकांच...
*महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांचे मार्फत इ.5 वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापकांचा सन्मान संपन्न
कोल्हापूर वार्ताहर-नारायण लोहार
*आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिका शाळातील शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.*
*या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त पुणे- मा. श्री. कृष्णात पिंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी- मा. श्री डी.सी. कुंभार साहेब होते.महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना संघटनेचे राज्याध्यक्ष- मा. श्री प्रसाद पाटील जिल्हाध्यक्ष -श्री एस के पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पुरोगामी संघटना शहर शाखेचे अध्यक्ष- मा. विलास पिंगळे प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिकेचे शैक्षणिक पर्यवेक्षक- मा. श्री बाळासाहेब कांबळे, प्राथमिक शिक्षक संघटना शहर शाखेचे शहर नेते- मा. श्री द्रोणाचार्य पाटील उपस्थित होते.*
*सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली त्यानंतर सर्वच उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.*
*यावेळी कार्यक्रमात बोलताना पोलीस उपायुक्त- कृष्णात पिंगळे म्हणाले सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे अभ्यासाबरोबर जे आपले आवडीचे क्षेत्र आहे त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे सर्व करत असताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं असतं समाजामध्ये सध्या घडत असलेले बदल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट सवयी कशा लागतात याची देखील अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना मंत्रमुग्ध केले. वाढत्या वयामध्ये विद्यार्थी शिक्षणाबरोबरच वाईट गोष्टींपासून वाईट व्यसनांपासून कसे परावृत होतील याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे इथून पुढचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या संदर्भात शिक्षकांशी नेहमी संवाद ठेवला पाहिजे. आपला विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेत कॉलेजला काय करतो त्याचे शिक्षण कशा पद्धतीने सुरू आहे या सगळ्या गोष्टींची विचारणा आपण संबंधित शिक्षकांना करणे गरजेचे आहे. त्यातूनच पालकांचे लक्ष हे विद्यार्थ्यांवर राहील आणि उत्तम प्रकारचे नागरिक घडल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी जोपासणे आवश्यक आहे चांगल्या गोष्टी ऐकणे आवश्यक आहे .प्रेरणादायी प्रवासवर्णने वाचणे आवश्यक आहे. त्यातून निश्चितच चांगला नागरिक घडू शकतो. विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल पुरोगामी शिक्षक संघटनेचे अभिनंदन केले*
*स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे मोठा अधिकारी होण्यासाठी फक्त पैसे हवे असतात असे नाही तर जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावरती आपण उत्तुंग यशाच्या शिखरावरती पोहोचू शकतो. डॉ.राजेंद्र भारूड साहेब यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच कृष्णात पिंगळे यांनी दगडफोड्या ते पोलीस उपायुक्त साहेब कसा घडलो याविषयी प्रेरणादायी प्रवास सांगितला. विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन पुढील भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.*
*प्राथमिक शिक्षण समितीकडील प्रशासन अधिकारी मा. डी.सी कुंभार साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचा अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*महानगरपालिकेचे विद्यार्थी 82 शिष्यवृत्तीधारक आहेत तर डोनेशन देऊन शिकणारे इतर शाळेतील विद्यार्थी 28 आहेत असे नमूद केले. यातूनच महानगरपालिकेच्या शाळांचा गुणवत्ता दर्जा दिसून येतो.
*त्यानंतर प्रसाद पाटील सर म्हणाले महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शहर शाखा या संघटनेने अतिशय चांगले उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी राबवले आहेत शिक्षकांची अनेक कामे शहर शाखेच्या माध्यमातून झालेली असून शिक्षण क्षेत्रातील कामाच्या जोरावर संघटनेने चांगला ठसा उमटवला आहे त्याबद्दल शहर शाखेचे अभिनंदन केले त्यानंतर महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना यांच्यामार्फत सुरू केलेली सुरू केलेला उपक्रम शैक्षणिक पालकत्व याचं प्राथमिक स्वरूपात दहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.*
*तसेच शहर शाखा नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला* *यावेळी संघटनेचे पदाधिकारी महिला अध्यक्ष- सौ सुजाता पवार, महिला सरचिटणीस- स्मिता कारेकर महिला कार्याध्यक्ष- श्रीमती गीता कुंभार महिला कोषाध्यक्ष- संजीवनी व्हरगे शहर शाखेचे अध्यक्ष- विलास पिंगळे सरचिटणीस- शिवाजीराव गुरव कार्याध्यक्ष- संतोष आंबेकर कोषाध्यक्ष- प्रकाश गावडे** तसेच पुरोगामी संघटनेचे सर्व शिलेदार त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते* *कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना संघटनेचे शहराध्यक्ष मा. विलास पिंगळे सर यांनी केले सूत्रसंचालन- विठ्ठल देवणे सर यांनी केले तर आभार- दीपक कुंभार यांनी मानले.*

No comments