Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

प्रतिभा कीर्तीकर्वे यांना आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्कार जाहीर

 प्रतिभा कीर्तीकर्वे यांना आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्कार जाहीर अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- पुणे येथे संपन्न होत असलेला दुसऱा...

 प्रतिभा कीर्तीकर्वे यांना आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्कार जाहीर



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-


पुणे येथे संपन्न होत असलेला दुसऱा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दिनांक २,३,४,५ जानेवारी रोजी भिडे वाडा देशातील मुलींची पहिली शाळा या नावाने होत असून कवी विजय अभिमान वडवेराव यांच्या संकल्पनेतून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन दुसऱ्या वर्षी यशस्वीरित्या होत आहे. या चळवळीमध्ये संविधान दूत म्हणून कृतीशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या व नावाप्रमाणेच प्रतिभा संपन्न लेखिका प्रतिभा कीर्ती कर्वे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संविधान दूत मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

      भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय अभियानांतर्गत संविधान जागर, प्रसार व प्रचार करण्याचे अतिशय पवित्र कार्य करत असल्यामुळे प्रतिभा कीर्तीकर्वे यांना हा बहुमान देण्यात येणार आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला प्रेरणा व गती मिळावी म्हणून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी लेखी पत्राद्वारे  कळवली आहे.

     प्रतिभा कीर्तीकर्वे या कविता, लेख, गझल या साहित्य प्रकारांमध्ये गेली दहा-बारा वर्षांपासून सातत्याने लिखाण करत आहेत. तसेच सामाजिक कार्यातही त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. समाजातील वंचित व गरजू घटकासाठी त्या मदत करत आहेत. कोरोनाच्या महामारी मध्ये त्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपल्या कृतिशील व्यक्तिमत्त्वाची ओळख समाजाला करून दिली. व एक वेगळा आदर्श समाजापुढे मांडला या त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन 2024 मध्ये समाज रत्न फुले प्रेमी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच अनेक सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी सन्मानित केले आहे. त्यांच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे. तसेच  काव्य जागर या संमेलनासाठी त्यांच्या कवितेची निवड झाली असून दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये त्यांची कविता यावर्षी रसिक प्रेक्षकांना व विशेषता फुले प्रेमींना ऐकण्यासाठी मिळणार  आहे.

No comments