चैतन्य दिनदर्शिकेचा पाथर्डी मध्ये भव्य प्रकाशन सोहळा संपन्न-अनंत ढोले (अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह) (पाथर्डी प्रतिनिधी) बाळासाहेब कोठुळे- पा...
चैतन्य दिनदर्शिकेचा पाथर्डी मध्ये भव्य प्रकाशन सोहळा संपन्न-अनंत ढोले (अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह)
(पाथर्डी प्रतिनिधी) बाळासाहेब कोठुळे-
पाथर्डी तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या उद्योग समूहापैकी अग्रस्थानी असलेल्या चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने श्री. दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर पाथर्डी शहरातील प्रगती हॉलच्या विचार मंचावर अध्यात्मिक क्षेत्रातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते व पाथर्डी शहराचे भाग्यविधाते माननीय अभय काका आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या थाटात व चैतन्यदायी वातावरणामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष अनंत ढोले ह. भ. प. तुकाराम महाराज चन्ने, श्री. बबनराव मंचरे, डॉक्टर जगदीश मुने, डॉक्टर सुहास उरणकर, डॉक्टर श्रीधर देशमुख श्री एकनाथ ढोले सर संदीप काकडे, चंद्रकांत घालमे, कारभारी वाघ गुरुजी, बाबासाहेब बांगर, प्रशांत शेळके, तुकाराम भांगे, सुशील बाहेती, संतोष ढोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी चैतन्य अर्बन ही संस्था दरवर्षी अध्यात्मिक व पौराणिक विषयांना दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे पवित्र कार्य करत असल्याबद्दल संस्थेचे भरभरून कौतुक केले. तर अभय काका यांनी वाढत्या नागरी समस्या व गरजा पूर्ण करण्यासाठी चैतन्य उद्योग समूहांनी उचललेले पाऊल पाथर्डीच्या वैभवामध्ये भर घालणारे असल्याचे म्हटले असून ग्रुपच्या योगदानाबद्दल सर्व संचालक व अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे अध्यक्ष अनंत ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा उद्योग समूह उभा करताना जिद्द ,चिकाटी व सातत्य याबरोबरच वेळेचे नियोजन या गोष्टीवर आम्ही भर दिला असून, येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये असेच पाथर्डीचा नावलौकिक आम्ही करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. तसेच 2026 सालाकरता दिनदर्शिका आपल्या सेवेमध्ये हजर करू असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी उद्योगसमूहातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भोलेनाथ मर्दाने यांनी केले, तर संचालक बंडोबा आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments