न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची फॉर्मसी कॉलेजला शैक्षणिक अभ्यास भेट पाथर्डी प्रतिनिधी बाळासाहेब कोठुळे – न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथ...
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची फॉर्मसी कॉलेजला शैक्षणिक अभ्यास भेट
पाथर्डी प्रतिनिधी बाळासाहेब कोठुळे –
न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथनगर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार, दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर येथे शैक्षणिक स्टडी व्हिजिट दिली. विज्ञान विषयातील औषधनिर्मिती प्रक्रिया, प्रयोगशाळेतील विविध उपकरणे, तसेच फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा हा या अभ्यासभेटीचा उद्देश होता.
अभ्यास भेटीच्या प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शांताराम खणगे सर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून औषधनिर्मिती उद्योगाचे वाढते महत्त्व समजावून सांगितले. प्रयोगशाळेतील तज्ञ प्रा. सौरभ सौंदर, प्रा. ऋषिकेश वराडे,प्रा. प्रज्ञा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व्हिस्कोसिटी मोजमाप, टॅबलेट कॉम्प्रेशन प्रक्रिया, औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे टप्पे, तसेच विविध प्रकारच्या संशोधन उपकरणांची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह दिली. विद्यार्थ्यांनी औषध निर्माण प्रक्रियेतील कच्चा माल, त्याचे रूपांतर, गुणवत्ता परीक्षण आणि पॅकिंगपर्यंतचे सर्व टप्पे प्रत्यक्ष पाहिले.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, बी.फार्मसी व एम.फार्मसीचे अभ्यासक्रम, तसेच औषध संशोधनामध्ये नव्याने उदयास येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. स्टडी व्हिजिटमुळे विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयातील उत्साह वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या अभ्यासभेटीचे आयोजन शाळेचे विज्ञान विषय शिक्षक अरुण कराळे सर आणि अर्चना जेधे मॅडम यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला नाथन मॅडम, सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या उपयुक्त आणि माहितीपूर्ण भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. अगदी शालेय स्तरावर अभ्यास भेट असा उपक्रम राबविल्या बद्दल प्राचार्य शांताराम खणगे सर आणि संस्थेचे जनरल सेक्रेटरी भास्करराव गोरे साहेब यांनी कौतुक केले.

No comments