शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप पाथर्डी प्रतिनिधी- बाळासाहेब कोठुळे- पाथर्डी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथनगर येथे इयत्ता...
शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप
पाथर्डी प्रतिनिधी- बाळासाहेब कोठुळे-
पाथर्डी तालुक्यातील
न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथनगर येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सेवा भारती संस्थेच्या वतीने गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विचार मंचावर
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. अरविंद पारगावकर सर माजी मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय पाथर्डी, प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. कृष्णा देहाडराय सर (सेवाभारती संस्था, अहिल्यानगर जिल्हा सेवा प्रमुख,
श्री राहुलदादा राजळे (विश्वस्त, आ.कृ.वि.प्र. आदिनाथनगर), मा. श्री भास्करराव गोरे साहेब (जनरल सेक्रेटरी, आ.कृ.वि.प्र. आदिनाथनगर), मा. कविवर्य श्री. बाळासाहेब कोठुळे राज्यसचिव द. युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, मा.श्री गणपत नाथन सर व मा.श्री दत्तात्रय दारकुंडे सर (सेवा संघ कासार पिंपळगाव) याच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माननीय अरविंद पारगावकर सर यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जीवनामध्ये काम करत असताना परोपकाराची भावना ठेवली पाहिजे, समाजातील गरजवंतांना मदतीसाठी पुढे आले पाहिजे, देशाविषयी प्रेम, आदरभाव व आत्मीयता अंगी बाळगली पाहिजे. दुसऱ्याला मदत करण्याचे समाधान हे सगळ्यात मोठे समाधान असून त्या भावनेने आपण काम करत गेलो तर राष्ट्रप्रेम वाढीस लागते असे विचार यावेळी त्यांनी मांडले. डॉक्टर देहाड राय यांनी मुलांना स्वच्छता, शिस्त यांचे महत्त्व समजून सांगितले. कवी बाळासाहेब कोठुळे यांनी मुलांना शेतकरी बापाची कहाणी या विषयावरील "पत्र' नावाची कविता ऐकवली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शिला नाथन मॅडम यांनी मान्यवरांचे सुरुवातीला स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर सेवक यांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
शालेय जीवनात गणवेशाचे महत्त्व, एकसंधता व विद्यार्थ्यांमध्ये समानता वृद्धिंगत करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, शिक्षकवृंद व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हास्य सम्राट व विद्यार्थी प्रिय शिक्षक राजीव सुरवसे यांनी केले.

No comments