"ताशा किंग"सिराज भाई मनियार 'ताशा सम्राट' पुरस्काराने सन्मानित. लोकशक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 पाथर्डी प्रतिनिधी-...
"ताशा किंग"सिराज भाई मनियार 'ताशा सम्राट' पुरस्काराने सन्मानित.
लोकशक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025
पाथर्डी प्रतिनिधी- बाळासाहेब कोठुळे-
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निरवी गावचे रहिवासी सिराज भाई मणियार ही पारंपरिक वाद्य वाजवण्यामध्ये माहीर असून वडिलांचा वारसा यशस्वीपणे सांभाळत आज महाराष्ट्रामध्ये ताशाकिंग या नावाने त्यांचा नावलौकिक आहे. सोशल मीडिया वरती युट्युबवर त्यांचे लाखो फॉलोवर्स असून महाराष्ट्रातील जनतेच्या आणि तरुणांच्या गळ्यातील ते आयडॉल बनले आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून दैनिक लोकशक्ती समूहाच्या पुरस्कार निवड समितीने त्यांना "महाराष्ट्र गौरव पुरस्कार" 2025 साठी निवडले असून त्यांना "ताशासम्राट' हा किताब मान्यवरांच्या शुभहस्ते नगर येथील हॉटेल यश ग्रँड या ठिकाणी प्रदान करण्यात आला. यावेळी विचार मंचावर नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर ,कवी कैलास दौंड पाथर्डी, दत्ताराम राठोड अप्पर पोलीस अधिकारी नागपूर, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड शिरूर कासार, प्रल्हाद गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिल्यानगर ,अन्सार शेख अध्यक्ष द. युवा ग्रामीण पत्रकार संघ, चित्रा दीक्षित सिने अभिनेत्री मुंबई, डॉ. आम्रपाली मोहिते सावली फाउंडेशन पुणे, वैभव कुऱ्हाडे (गंठण कुमार) वेब सिरीज कलाकार, डॉ. बाबासाहेब देवकाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, मुख्य संपादक प्रा. विजय लेंडाळ, कार्यकारी संपादक इम्रान शेख, कविवर्य बाळासाहेब कोठुळे, शकील मणियार पुणे जिल्हा प्रतिनिधी, वजीर शेख, प्रदीप बोडके शेवगाव प्रतिनिधी, तारामती दिवटे महिला प्रतिनिधी शेवगाव, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सिराज भाई मणियार यांनी ताशाची परंपरा अनेक वर्षांपासून सांभाळत ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक वाद्यकलेची उपासना केली असून आजच्या डीजेच्या भयान थयथयटा पासून वाचवण्यासाठी व तरुणांमध्ये या वाद्याची गोडी निर्माण करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक उत्सवा मधून आपल्या कलेचे प्रदर्शन करत त्यांनी अनेक चाहते महाराष्ट्रामध्ये निर्माण केले आहेत. लोप पावत चाललेली कला जिवंत ठेवत तिला उर्जित अवस्था प्राप्त करून देत त्यांनी तरुणांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली. म्हणून दैनिक लोक शक्तीने त्यांना हा किताब प्रदान केला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामांकित कलाकार , व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे दमदार प्रस्ताविक ज्येष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन के. बी. शेख यांनी केले, कार्यक्रमाचे शेवटी संपादक प्रा. विजय यांनी सर्वांचेआभार मानले.

No comments