Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

 लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-लो...

 लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न



पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील हॉटेल यश ग्रँड येथे मान्यवरांचे उपस्थितीमध्ये  संपन्न झाला.

      या कार्यक्रमासाठी नाशिक येथील जेष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, पाठ्यपुस्तकातील कवी कैलास दौंड पाथर्डी, दत्ताराम राठोड अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड शिरूर कासार, प्रल्हाद गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका, अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, चित्रा दीक्षित सिने अभिनेत्री मुंबई, .डॉ. आम्रपाली मोहिते सावली फाउंडेशन पुणे, वैभव कुऱ्हाडे  विनोद सम्राट( गंठण ) मस्ती फेम, डॉक्टर भाऊसाहेब देवकाते सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, लोकशक्तीचे मुख्य संपादक विजय लेंडार, कार्यकारी संपादक इम्रान शेख, कविवर्य बाळासाहेब कोठुळे, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐश्वर्य पाटेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मला शिकण्यासाठी वर्तमानपत्र हे माझे आयुष्यात गुरुच्या स्थानी आहे वर्तमानपत्र हा समाजाचा आरसा असतो. माझ्या प्रतिकूल परिस्थितीतही मला वर्तमान पत्राने अत्यंत महत्त्वाची साथ दिली की ज्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये उच्चतम दर्जाचे ज्ञान मिळवताना आले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न फक्त पत्रकारच विचारू शकतात. तर पत्रकारांची लोकशाहीतील भूमिका व चौथा स्तंभ म्हणून काम करताना अत्यंत संवेदनशील आणि मोलाची असल्याचे मत कवी कैलास दौंड यांनी यावेळी मांडले.

  ‌.  महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 67 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये 400 च्या वर प्रतिनिधी लोकशक्ती परिवारामध्ये काम करत असून सत्य- निर्भीड व निपक्ष भूमिका घेऊन सध्या लोकशक्ती कार्य करीत आहे वंचित आणि शोषितांना न्याय भूमिका देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची भूमिका माननीय संपादक विजय लेंडार यांनी यावेळी मांडली. या परिवाराला कृतिशील कार्यकारी संपादक इम्रान शेख सर यांची मोलाची साथ असल्याची भूमिका यावेळी लेंडार सर यांनी मांडली.

      या कार्यक्रमासाठी लोकशक्ती परिवारातील सर्व प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, कीर्तनकार, प्रवचन कार, समाज प्रबोधन कार, संगीतकार, कलावंत, डॉक्टर, वकील ,शिक्षक, उद्योजक ,प्रगतशील शेतकरी, साहित्यिक, व अन्य इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन के. बी. शेख यांनी केले. तर कार्यक्रमाचे दमदार प्रास्ताविक कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार मुख्य संपादक विजय लेंडार  यांनी मांनले, समारोपणानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

No comments