Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

खड्ड्यांमुळे त्रस्त गडचिरोली जिल्हावासीयांचा पालकमंत्री फडणवीसांना संतप्त सवाल

 👉 खड्ड्यांमुळे त्रस्त गडचिरोली जिल्हावासीयांचा  पालकमंत्री फडणवीसांना संतप्त सवाल 👉 भोकं पडलेल्या आणि अरूंद रस्त्यांमुळे अपघातात अनेकांचा...

 👉 खड्ड्यांमुळे त्रस्त गडचिरोली जिल्हावासीयांचा  पालकमंत्री फडणवीसांना संतप्त सवाल



👉 भोकं पडलेल्या आणि अरूंद रस्त्यांमुळे अपघातात अनेकांचा मृत्यू. 


गडचिरोली ( चक्रधर मेश्राम)  96234 59632

:- गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे  बाराही तालुक्यात प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.

 गडचिरोली  जिल्ह्यातील त्रस्त नागरिकांनी समाज माध्यमावर मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘हेच का तुमचे ‘स्टील हब’, असा संतप्त सवाल केला आहे.  खड्डेमुक्त रस्त्यांसाठी राजकीय पक्षांकडून  विविध प्रकारच्या टिका केली जात आहे. मागील ५ वर्षपासून हीच परिस्थिती असल्याने यावर लवकर मार्ग न काढल्यास याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अतिदुर्गम दक्षिण भागातील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या आष्टी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले आहे. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गंभीर आजारी रुग्णांना जिल्हा मुख्यालयी नेण्यासाठी जोखीम पत्करावी लागत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दररोज नरक यातना सोसण्याशिवाय पर्याय नाही. अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे.  राजघराण्यातील आमदार आणि राज्यमंत्री असलेल्या अहेरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याची तर अत्यंत बिकट अवस्था आहे.

भामरागड तालुक्यात तर अनेक गावांना जोडणाऱ्या वाटेत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने आजारी रुग्णांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सिरोंचा, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यात तर अधिकच विदारक पारिस्थिती आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्यामान पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या रस्त्यांसाठी प्रयत्न करीत आहेत. पण घोडे कुठे अडले,? हे कुणालाच माहिती नाही. एवढेच नव्हे तर सुरजागड लोहखानीच्या जवळून जाणारा गट्टा मार्गांवरून तर पायदळ चालणे कठीण झाले आहे. चामोर्शी हरणघाट मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने मोठ्या वाहनांना देखील या मार्गावरून जाणे शक्य नाही. हा मार्ग मागील तीन वर्षापासून लालफितीत अडकला आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठमोठ्या भेगा आणि असमतोल अवस्था झाली आहे. धानोरा,आरमोरी,कोरची,

कुरखेडा याही तालुक्यात रस्त्यांची  गंभीर  परिस्थिती आहे. 

लोकप्रतिनिधीं, शासन  प्रशासनाच्या निष्क्रियतेचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. 

पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दौऱ्यात गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनवू अशी घोषणा केली. मोठे उद्योग आणि विकास होणार असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात साधे रस्ते सुद्धा बांधण्यात  देवेंद्र फडणवीस सरकार अपयशी ठरत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे तीनही विधानसभेतील आमदारांना याबद्दल गंभीरता नसल्याने त्यांनाही अधिकारी गंभीरतेने घेतांना दिसून येत नाही. त्यामुळे पिडीत नागरिकांनी यांच्या विरोधातही रोष व्यक्त केला आहे.

प्रशासकीय विभाग उदासीन   असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भात तोडगा निघाला नाही. मागील दोन जिल्हा नियोजनाच्या बैठकीत तर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. पण पारिस्थिती जैसे थे आहे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी विविध भागाचा दौरा करून यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडलेला दिसत नाही. दरवर्षी डागडुजीवर शेकडो कोटी खर्च करतात. पण परिस्थिती सुधारत नाही.

No comments