Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

आयुर्वेद ही भारतीयांची प्राचीन उपचार पद्धती आहे-वैद्य नंदकिशोर औटी

 आयुर्वेद ही भारतीयांची प्राचीन उपचार पद्धती आहे-वैद्य नंदकिशोर औटी वेदनेच्या मुळाशी घाव घातला की, आजार आपोआप पळून जातात. पाथर्डी प्रतिनिधी-...

 आयुर्वेद ही भारतीयांची प्राचीन उपचार पद्धती आहे-वैद्य नंदकिशोर औटी



वेदनेच्या मुळाशी घाव घातला की, आजार आपोआप पळून जातात.

पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-भारतातील जेवढ्या उपचार पद्धती अस्तित्वात आहेत त्यापेक्षा आयुर्वेद ही सर्वात जुनी व प्राचीन उपचार पद्धती असून ती मानवी आजारांच्या समस्येच्या मुळावर घाव घालते व मानवाला व्याधीच्या  मुळापासून दूर करते. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला उपचार केल्यानंतर थोडा काळ वाट पहावी लागते. औषधाची मात्रा सुरू केल्यानंतर ऍलोपॅथी सारखा रुग्ण लगेच बरा होत नाही. औषधाची मात्रा त्याच्या शरीरामध्ये गेल्यानंतर तिचा गुण येण्याकरता रुग्णाला 30 ते 40 दिवस वाट पाहावी लागते त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने वेदनेपासून मुक्त होतो. भारतीय ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून या पद्धतीचा अवलंब केलेला अनेक धर्मग्रंथांमध्ये व वेगवेगळ्या संदर्भ साहित्यामध्ये पहावयास मिळतो. असे मत पाथर्डी येथील प्रसिद्ध नंदकिशोर आयुर्वेदिक औषधलायाचे संचालक वैद्य नंदकिशोर औटी यांनी काल दैनिक लोक शक्तीशी संवाद साधताना सांगितले.

    पाथर्डी सारख्या ग्रामीण भागामध्ये ते गेली वीस वर्षापासून आयुर्वेदिक उपचार पद्धती रुग्णांना देऊन त्यांची मनोभावे सेवा करतात. अतिशय माफक दरामध्ये ते रुग्णांना औषध उपलब्ध करून देतात त्यांचा स्वतःचा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त औषध निर्मितीचा कारखाना असून ते झाड  पाल्याचा उपयोग करून व अन्य जंगली वनस्पतीचा वापर करून वेगवेगळ्या आजारावर स्वतः औषध बनवण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमृतधारा तेल, शांती पेन ऑईल, विरेचक चूर्ण, मेह चूर्ण, चिरंजीवी चूर्ण, पंचरत्न चूर्ण, प्रमेय चूर्ण, मसाज ऑइल, केशांत हेअर ऑइल, दंतमंजन इत्यादी आयुर्वेदिक औषध वैद्य नंदकिशोर औटी स्वतः तयार करतात व त्यामधून आज पर्यंत हजारो रुग्ण बरे होऊन सुखी जीवनाचा आनंद घेत आहेत.

      शरीरामध्ये निघणाऱ्या चमका, श्वसन विकार, सर्दी, खोकला, विंचूदश, नायटा, पोटदुखी, सांधेदुखी, मान ,पाठ कंबर, मुळव्याधी, बद्धकोष्ठता, फिशर, मधुमेह, पचनक्रिया, वजन कमी करणे, रक्त शुद्धी, शक्ती वर्धक, अशक्तपणा, गुडघ्यातून आवाज येणे, वैवाहिक जीवन समृद्ध करणे, अपचन, ऍसिडिटी पित्त, केस गळणे, अकाली पांढरे होणे, झोप शांत न लागणे, दात दुखी हिरड्यांमधून रक्त येणे, व दातांच्या बळकटीकरणासाठी या व अशा अनेक मानवी समस्येचे निराकरण या औषधामुळे होऊन आजार समूळ नष्ट होतो असा दावा त्यांनी केला आहे, त्यामुळे समाजातील पिडीत रुग्णांनी एक वेळ नंदकिशोर आयुर्वेदिक औषधालय, नवीन बस स्टँड च्या समोर, चोरडिया कॉम्प्लेक्स पाथर्डी या ठिकाणी सेंटरला भेट द्यावी व या उपचार पद्धतीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वैद्य नंदकिशोर औटी, संपर्क- 9869962261 यांनी केले आहे.

No comments