Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

पुनम काकडे हिने मिळवले वेटलिफ्टिंग मध्ये घवघवीत यश

  पुनम काकडे हिने मिळवले वेटलिफ्टिंग मध्ये घवघवीत यश पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- दिनांक:12/11/ 2025 रोजी नाशिक येथे घेण्यात आ tcलेल्...

 पुनम काकडे हिने मिळवले वेटलिफ्टिंग मध्ये घवघवीत यश



पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-


दिनांक:12/11/ 2025 रोजी नाशिक येथे घेण्यात आ tcलेल्या, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आयोजित नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा 2025 मध्ये नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी पूनम गणेश काकडे हिने प्रथम क्रमांक मिळवला आणि नॅशनल स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. पुनम काकडे ही चॅम्पियन वेटलिफ्टिंग क्लब नाशिकची विद्यार्थिनी आहे. कष्टकरी कुटुंबात जन्मलेली पुनम ही गणेश ज्ञानदेव काकडे यांची मुलगी असून नांदूर निंबादैत्य तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या गावची रहिवाशी आहे.  तिच्या घरात कोणताही वेटलिफ्टिंग चा वारसा नसतानाही तिने खडतर मेहनतीने व संघर्षाने हे घवघवीत यश मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल आदर्श शिक्षक श्री शहादेव काळे सर, सरपंच संजय देशमुख, उपसरपंच भागवत वाघ, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वामन, श्री निंबादैत्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देशमुख व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

No comments