दिवाळी सणाच्या धान्य वाटपात पुणे विभागात करवीर तालुका पहिला क्रमांक धान्य वाटप 97.67% फुलेवाडी वार्ताहर करवीर तालुक्याचा अभिमान! धान्य व...
दिवाळी सणाच्या धान्य वाटपात पुणे विभागात करवीर तालुका पहिला क्रमांक
धान्य वाटप 97.67%
फुलेवाडी वार्ताहर
करवीर तालुक्याचा अभिमान!
धान्य वाटपाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे करवीर तालुक्याने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ही अभिमानास्पद कामगिरी प्रत्येक सरकारी धान्य दुकानधारकांच्या प्रामाणिक परिश्रम, वेळेवर वाटप आणि जनतेप्रती असलेल्या जबाबदारीचे फलित आहे. असे
उदगार करवीर तालुका धान्य पुरवठा विभागाचे निरीक्षक श्री.विकास देसाई यांनी काढले.
.
सर्व रास्त भाव दुकानदार, संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांचे पुरवठा निरीक्षक विकास देसाई यांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळेच करवीर तालुक्याचा हा गौरव शक्य झाला आहे.
अशाच रीतीने कामातील पारदर्शकता, सेवा तत्परताआणि कार्यक्षमतेचा आदर्श कायम ठेवू या असे पुरवठा निरीक्षक विकास देसाई यांनी सांगितले.करवीर तालुक्याला हे यश मिळाल्याने जिल्हा पुरवठा अधिकारीश्रीमती चव्हाण मॅडम यांनी करवीर पुरवठा अधिकारी श्री. विकास देसाई व त्यांचे सर्व सहकारी, सर्व दुकानदार यांचे अभिनंदन केले आहे.

No comments