जय किसान सेवा सोसायटीची 43 वी सर्वसाधारण सभा संपन्न कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार जय किसान सेवा सोसायटी सोनुर्ले, तालुका शाहूवाडी या स...
जय किसान सेवा सोसायटीची 43 वी सर्वसाधारण सभा संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार
जय किसान सेवा सोसायटी सोनुर्ले, तालुका शाहूवाडी या संस्थेची 43 वी सर्वसाधारण सभा सोसायटी हॉलमध्ये संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक आकाराम पाटील सर यांनी केले.
संस्थेचे सचिव शिंदे यांनी अहवाल वाचन केले. सोसायटीच्या सभासदांनी वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारले. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने दिली . थकीत कर्ज असणाऱ्या सभासदांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवण्यात सभासदांनी सोसायटीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. सभासदांच्या अनेक शंकांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे निरसन तसेच सोसायटीचे सदस्य अण्णा पाटील सर म्हणाले की सर्व सभासदांनी येथून पुढे सभेला उपस्थित राहिले जय किसान सेवा सोसायटी नावा रूपाला आणण्याचे ध्येय सर्वांनी ठरवले पाहिजे. थकीत कर्ज राहणार नाही याची सर्व सभासदांनी खबरदारी घ्यावी. तसेच संस्थेचे सदस्य श्री. अण्णा पाटील सर, श्री. प्रकाश नाईक व संस्थेचे लिपिक संजय झिटे यांचा सत्कार करण्यात सभेला सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, त्याचबरोबर अनेक सभासद उपस्थित होते. शेवटी सोसायटीचे सदस्य श्री. अण्णा पाटील सर यांनी सर्व उपस्थितितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments