नेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मिता दिंडे यांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान नेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मिता दिंडे यांचा आदर्श...
नेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मिता दिंडे यांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान
नेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मिता दिंडे यांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार स्नेहलोक फौंडेशन, कोल्हापूर व राष्ट्रीय पोलीस मित्र संघटना कोल्हापूर यांच्या वतीने नामवंत सरपंचाचा जाहीर सत्कार समारंभ दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी पेटवडगाव या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने व साध्वी माताजी आणि पुढारीचे व्यस्त पत्रकार एकनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. नेर्ले तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या गावच्या सरपंच सौ. अस्मिता दिलीप दिंडे यांना आदर्श सरपंच म्हणून खासदार धैर्यशील माने, साध्वी माताजी, प्रेस दर्पणचे उपसंपादक पांडुरंग बेलेकर, तरुण भारतचे पत्रकार नारायण लोहार आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.सरपंच सौ.अस्मिता दिंडे यांनी 22ऑगस्ट 2025रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यांनी सरपंच पदाचे मिळणारे मानधन पंचवीस हजार रुपये श्री ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देवस्थान कमिटीकडे सुपूर्त केले. गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी एटीएम वॉटरची सोय केली. गावातील ठळक पांढरी देवालयाचे सुशोभीकरण केले.
मराठी शळेत ॲक्वागार्ड बसवले. अंगणवाडी दुरुस्ती व विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप केले. दलित वस्तीमध्ये गटाराची सोय केली. गावामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी बसवले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंटची बाकडी बसवली. महिलांच्यासाठी ग्रामपंचायत लघुउद्योग प्रशिक्षण राबवले. घरफाळा वेळेवर भरणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून चांगल्या दर्जाची कचराकुंडी वाटप केली. ही सर्व कामे करताना कोणत्याही प्रकारचे सरपंचांनी कमिशन घेतलेले नाही. अतिशय पारदर्शक कारभार केल्यामुळे आदर्श सरपंच हा सन्मान त्यांना प्रदान केलेला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे निर्णय ग्रामपंचायतचे नाव शाहूवाडी तालुक्यात अग्रस्थानी आलेले आहे. हा सन्मान आपल्याला नेरले गावातील जेष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनामुळे मिळाला असल्याचे सौ. अस्मिता दिंडे यांनी नमूद केले. गावातील अनेक मान्यवराने त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments