गडचिराेली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी आणि गडचिराेली नगरपरिषद निवडणूका लढविणार. 👉 तिन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदी सैनिक समाज पार्ट...
गडचिराेली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी आणि गडचिराेली नगरपरिषद निवडणूका लढविणार.
👉 तिन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदी सैनिक समाज पार्टीचे उमेदवार?
👉 महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे यांचे मत.
गडचिराेली (जिल्हा प्रतिनिधी) गडचिराेली जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया रखडलेला होत्या. नगरसेवक या पदावर असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या नगर सेवक सत्तारुढ होण्यासाठी कामाला लागले आहेत. अशी चर्चा सर्वत्रच सुरु आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८ ऑक्टोबर रोजी गडचिराेली १ ते १३ प्रभागातील २७ नगरसेवक पदासाठी, आरमोरी नगरपरिषदेच्या १ ते १० प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविका पदाचे संवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्य शासनाने नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या अध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार त्यासाठी आरक्षण जाहीर केले. त्यामुळे राज्यातील सर्व नगरसेवक आणि इच्छूकांच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत.यात गडचिरोली नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला, आरमोरी अनुसूचित जाती (खुला) तर देसाईगंज साठी नामाप्र महिला राखीव ठेवण्यात आले आहे. आता अनेकांचे लक्ष प्रभागनिहाय आरक्षण देण्यात आलेल्या विभागाकडे वेधले आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामुळे अनेकांचे राजकीय समिकरण बिघडले आहे. अनेक राजकीय पक्ष आता निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने भाजप आणि काँग्रेस तसेच प्रस्तापित पक्षातील राजकारण्यांना भिती वाटत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या निवडणुकीत सर्वत्र सैनिक समाज पार्टी शेतकरी , कामगार, आणि शेवटच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी घरोघरी पोहचणार आहे. तशी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधितज्ञ ॲड. शिवाजी डमाळे यांनी सांगितले. त्यामुळे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूकीत सैनिक समाज पार्टीला भरघोस यश मिळणार आहे.
No comments