Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

सातवे येथे ‘ऋणानुबंध मायेचं घर’ या उपक्रमासाठी श्रमदान उत्साहात

 सातवे येथे ‘ऋणानुबंध मायेचं घर’ या उपक्रमासाठी श्रमदान उत्साहात  बच्चे सावर्डे प्रतिनिधी सुनिल पाटील  सातवे : ‘ऋणानुबंध मायेचं घर – सातव्या...

 सातवे येथे ‘ऋणानुबंध मायेचं घर’ या उपक्रमासाठी श्रमदान उत्साहात



 बच्चे सावर्डे प्रतिनिधी सुनिल पाटील 

सातवे :

‘ऋणानुबंध मायेचं घर – सातव्यातलं सातवं’ या उपक्रमासाठी रविवारी उत्साहात श्रमदान करण्यात आले. सातवे व कोडोली विभागातील शिवम प्रतिष्ठानचे साधक, श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांचा भक्त परिवार तसेच आभाळ माया फाउंडेशन शाहुवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मनापासून सहभाग घेत जबाबदारीपूर्वक काम पूर्ण केले.

या श्रमदानात जुने घर उतरविण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, लाइन आउट व पाया खुदाईची तयारीही पूर्ण झाली. सेवा आणि सहकार्य देण्यासाठी वेळ काढून हातभार लावणाऱ्या सर्वांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

घराचा प्लॅन व एस्टिमेट तयार करून कामाची देखरेख करण्याची जबाबदारी शिवम साधक श्री सोहन दळवी सरकार (सातवे) यांच्याकडे असून, याच दिवशी त्यांचा जन्मदिन असल्याने त्यांनी सर्वांना वडापाव नाष्टा देत श्रमदानाची सांगता केली. यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी वडगांवहून आलेले जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बी.पी. मिरजकर महाराज यांनी मा. इंद्रजीत देशमुख साहेब (काकाजी) यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तरुण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

No comments