पीएम श्री महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी 'रग्बी' खेळात अव्वल फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार *कोल्हापूर महानगरपालिका शालेय शास...
पीएम श्री महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी 'रग्बी' खेळात अव्वल
फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार
*कोल्हापूर महानगरपालिका शालेय शासकीय क्रीडास्पर्धेत पीएम श्री महात्मा फुले विद्यालयाने इतिहास रचून प्रथमच रग्बी या खेळात 14 वर्षाखालील वयोगटात मुलीच्या संघाने फायनलमध्ये नागोजीराव पाटणकर हायस्कूल या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला .*तसेच शाळेच्या संघाची निवड विभाग स्तरावर झाली .*सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला.सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून मानसी मोमले हिला गौरविण्यात आले.मुलींचा संघ पुढीलप्रमाणे मुद्रा देशमुख, मुग्धा चौगले, स्वरा वरेकर, वैष्णवी करे , मैथिली कांबळे,पूर्वा पुजारी, नेत्रा कांबळे, तनिष्का पाटील, ऐश्वर्या कस्तुरे, तनिषा विटेकर, अन्नपूर्णा खारकर
वरील खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा शिंत्रे, क्रीडा शिक्षक श्री.श्रीकांत पाटील,श्री.लखन चव्हाण,शिक्षक श्री.राहूल बागडे ,सौ.स्वाती चौगले,सौ.नयना बडकस व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.*
No comments