Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

हात्राळ -सैदापूर येथे गांधी जयंती उत्साहात साजरी

 हात्राळ -सैदापूर येथे गांधी जयंती उत्साहात साजरी अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील हात्राळ -सैदापूर येथे गांधी जयंत...

 हात्राळ -सैदापूर येथे गांधी जयंती उत्साहात साजरी



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील हात्राळ -सैदापूर येथे गांधी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दिनांक 2 ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून देशात सर्वत्र हा उत्साह गांधी जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतासह जगभरातही गांधी जयंती साजरी केली जाते. संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून जाहीर केला आहे. यावेळी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हात्रा ळ गावचे लोकप्रिय सरपंच दादा पाटील शिवणकर, कृतिशील उपसरपंच शिवसंग्राम चे नेते श्री परमेश्वर टकले, ग्रामविकास अधिकारी श्री संदीप ढाकणे, सैदापूर गावचे उपसरपंच श्री संभाजी केदार, सामाजिक कार्यकर्ते बबनराव केदार, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव बडे, पोपटराव केदार, बंडू केदार,पो. कॉन्स्टेबल बबन केदार आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

      भारतासारख्या देशांमध्ये महात्मा गांधी यांच्या विचाराचा मोठा प्रभाव असून अहिंसेजी पुजारी म्हणून गांधीजींच्या विचारांची आजही जनमानसामध्ये एक वेगळी प्रतिमा पाहायला मिळते. सत्य व अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव गांधी विचारांमध्ये दिसून येतो. म्हणून तर गांधीजी यांना अहिंसेचे पुजारी म्हणले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजी यांनी अनेक आंदोलने व चळवळी गतिमान केल्या होत्या . राष्ट्रपिता या नावाने गांधींजीना जगभरामध्ये ओळखले जाते. आजही त्यांच्या आचार व विचारांची पूजा होते. सरकारने गांधीजीच्या जयंतीनिमित्त गांधी उत्सव सर्वत्र साजरा करण्याचा आदेश दिला आहे. शाळा महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयामध्ये गांधी जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने दोन ऑक्टोबर रोजी गांधीजीच्या नावाने स्वच्छता अभियान कार्यक्रम काही काळ राबवला होता. अशा या महान  नेत्याला हात्राळ -सैदापूर ग्रामस्थांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.

No comments