गडचिराेली वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठात्यांला तात्काळ हटवा- सैनिक समाज पार्टीची मागणी. ⭕ शल्य चिकित्सकांनी रुग्णसेवेवरून पत्र लिहून काढले...
गडचिराेली वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठात्यांला तात्काळ हटवा- सैनिक समाज पार्टीची मागणी.
⭕ शल्य चिकित्सकांनी रुग्णसेवेवरून पत्र लिहून काढले वाभाडे…
⭕ वैद्यकीय महाविद्यालयात अनियमितता. डॉ टेकाडे तात्काळ हटावची मागणी.
नागपूर (विशेष प्रतिनिधीं) दि. 2 आक्टोंबर 2025:-
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांच्यावर टीका करित रुग्णसेवेच्या कुचराईबाबत तक्रार नोंदवली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील अनियमिततेवरून प्रशासनात टोकाचे शब्दयुद्ध झाले असल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील अनेक महिन्यांपासून गडचिराेली येथील वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बाबतीत अनियमतता असल्याने अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांच्या संदर्भात अनेक आरोप होत आहेत. आणि ते आरोप वास्तविक असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. डॉ. टेकाडे यांच्या कारभाराचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी पत्र लिहून वाभाडे काढले. यात जिल्हा रुग्णालयात नियुक्त केलेल्या २९ चिकित्सालयीन प्राध्यापक रुग्णसेवेत कुचराई करित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी केला आहे.
यावरुन जिल्हा शल्यचिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यात जुंपली असून रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य हवे, अन्यथा परिणाम गंभीर असतील अशा शब्दांत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांना सुनावले आहे.
चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू, बांधकामावर केलेली उधळपट्टी, त्यानंतर जागेचा वाद यामुळे हे महाविद्यालय सातत्याने वादाच्या चर्चेत आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महिनाभरापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन बांधकामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले, त्यामुळे अधिष्ठाता डॉ अविनाश टेकाडे हटाव ची मागणी सैनिक समाज पार्टीकडुन केली जात आहे .
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांच्या भूमिकेवर आणि कार्यप्रणालीवर आक्षेप घेत कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गडचिरोलीत प्रशासकीय अधिकाऱ्यांत रंगलेल्या लेटरवॉरची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशासनावर अंकुश कोणाचा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गैर जबाबदारीची वागणूक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील २९ चिकित्सालयीन प्राध्यापकांना वैद्यकीय सेवेसाठी ४ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते . मात्र, ते सेवाच देत नाही, त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचे कामकाज , रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिष्ठातांना लेखी पत्र पाठवून कळविले होते. त्यावर अधिष्ठातांनी आक्षेप घेतला होता. खरे पाहता अधिष्ठाता यांच्या सर्व भोंगळ कारभाराची तातडीने चौकशी सुरू करून बडतर्फ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधीतज्ञ ॲड. शिवाजी डमाळे , जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांना २४ सप्टेंबर रोजी पत्र लिहून पत्रावर कोणाची स्वाक्षरी आहे, यावर आक्षेप घेणे व्यर्थ असल्याचे नमूद केले आहे. ही गैरजबाबदार अणि वेळकाढूपणाचे धोरण आहे.
प्राध्यापक अद्यापही सेवा देत नाही ही मूळ समस्या असल्याच्या मुद्द्याकडेही डॉ टेकाडे यांनी दुर्लक्ष केले आहे. जिल्हा रुग्णालयात नियुक्त प्राध्यापकांनी नियमित हजर राहून सेवा द्यावी, पत्रावर स्वाक्षरी किंवा पदनामावर वाद घालणे थांबवावे असे डॉ. किलनाके यांनी म्हटले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची बहुतांश पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचेही धोरण वेळकाढूपणाचे आहे. औषधी, अस्थिरोग आदी विभागांत प्राध्यापक सेवा देतच आहेत. सेवा देण्यास कोण टाळाटाळ करित आहे याची यादी द्यावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.❓ गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात निधी असूनही प्रात्यक्षिक साहित्यांसाठी जिल्हा रुग्णालयाकडून उसनवारी मागवणे, विकासकामांमध्ये अनियमितता, आणि प्राध्यापकांची कमतरता यांसारख्या प्रशासकीय अनियमिततांचे गंभीर आरोप सैनिक समाज पार्टीचे वतीने केले जात आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) देखील महाविद्यालयास 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. कोटींच्या घरात निधी असूनही प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आवश्यक साहित्य जिल्हा रुग्णालयातून उसनवारीवर मागवले जात आहे, ही महाविद्यालयाची फारच दयनीय स्थिती दर्शवते.
विकासकामे आणि नियोजनाचा कामात मोठा भोंगळ कारभार आहे. २८ कोटींच्या विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोपही सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केले आहेत,
महाविद्यालयात पुरेसे प्राध्यापक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापन कार्यात मोठा अडथळा येत आहे, त्यामुळे दर्जेदार डॉक्टर घडविण्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांवर रुग्णसेवेबाबत कुचराई केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सकांनी टीका केली असून, त्यांच्यावर अनियमिततेचे आरोपही केले आहेत.
अधिकृत कारवाई:
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्व घटनांमुळे गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अनियमिततांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, शैक्षणिक दर्जा खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. असे मत सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
No comments