Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

प्राथमिक शिक्षिका करुणा मोहिते यांना शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार वितरण करताना उपस्थित मान्यवर

 फुलेवाडी वार्ताहर-नारायण लोहार निगडी, तालुका शिराळा, जि. सांगली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते या...



 फुलेवाडी वार्ताहर-नारायण लोहार


निगडी, तालुका शिराळा, जि. सांगली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, , शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक महेश पालकर, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा निगडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली यांनी आपल्या शाळेचा लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून कायापालट केला. विविध उपक्रम यामध्ये विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवार्ड हेकेथॉन विज्ञान प्रदर्शन, स्काऊटगाईड यातून विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोचवले.


विद्यार्थ्यांना विविध भौतिक सुविधा मिळवून दिल्या. संगणक कक्ष, ग्रंथालय, विज्ञान, प्रयोगशाळा, पिण्याच्या पाण्याची टाकी, संगणक, स्कूल बॅग, स्पोर्ट ड्रेस, वह्या असे विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यासाठी मिळविले. लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध ऑनलाईन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग घेऊन यश मिळविले. कोरोनाकाळात  शाळा बंद होत्या. परंतु त्यावेळी करुणा मोहिते यांनी शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम  राबविला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना उत्कृष्टपणे सर्व विषयाचे शिक्षण दिले. कोरोनाकाळापासून निरंतर वाचन हा उपक्रम त्या आज पर्यंत राबवीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे. याबाबत त्यांनी राज्यस्तरावर शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक आणि राज्यातील निवडक उपक्रमशील शिक्षक यांच्यासमोर निरंतर वाचन प्रभावीपणे सादरीकरण केले. त्याबद्दल शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांनी त्यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले.


राज्य शैक्षणिक संशोधन व उपक्रमात प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे आणि वर्चुअल क्लास, दीक्षा ॲप अभ्यासक्रम निर्मिती, १ व २ कृती पुस्तिका निर्मिती, शालेय दिनदर्शिका निर्मिती, पॅट चाचणी निर्मिती या राज्यस्तरीय उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कृतिशील मार्गदर्शन केलेले आहे.


शासनाच्या अनेक विषयांच्या अभ्यासक्रम निर्मितीत त्यांनी काम केले आहे. शासनाच्या पोर्टलवर त्यांचे अनेक ई-साहित्य अपलोड करण्यात आले आहे. त्यांनी राबविलेले नवनवीन उपक्रम राज्यस्तरावर पात्र ठरलेआहेत. त्याबद्दल शासनाच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते. सामाजिक बांधिलकी जपत अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा प्रथा बंदीसाठी ठोस पाऊल उचलले. विधवा महिलांना समाजामध्ये धार्मिक सामाजिक विधीमध्ये सहभाग घेता यावा यासाठी गावोगावी सभा घेऊन मार्गदर्शन व जनजागृती करून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे . करुणा मोहिते यांच्या शैक्षणिक कार्याचा आवाका फार मोठा आहे.म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यातील महिलांमधून त्या एकमेव या पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा, शिराळा तालुका व निगडी प्राथमिक शाळा यांना करुणा मोहिते यांच्या बद्दल फार मोठा अभिमान वाटत आहे. शिक्षिका करुणा मोहिते यांचे पती सुनील कांबळे हे आनंद माध्यमिक विद्यालय भेडसगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम मकरत आहेत. करुणा मोहिते यांचे सासर भेडसगाव ता. शाहुवाडी ,जि. कोल्हापूर आहे. त्यामुळे या गावातील लोकांनी त्यांचे अभिनंदन केले 

आहे.तसेच सांगलीचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड, शिराळ्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, गटविकास अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी करुणा मोहिते यांचे अभिनंदन केले आहे. शाहूवाडी तालुक्यातून अनेक मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील दुर्गा, करुणा मोहिते यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

No comments